आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे  क्रीडा स्पर्धामध्ये यश!!

निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे  क्रीडा स्पर्धामध्ये यश!!

पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत तालूकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धामध्ये निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी तालुका क्रिडा स्पर्धे मध्ये चमकले असून यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१४ वर्षाखालील मुले- सार्थक पांडुरंग टाव्हरे-गोळा फेक प्रथम , पियुष रामदास टाव्हरे-८० मीटर अडथळा शर्यत द्वितीय . १७ वर्षाखालील मुले . यश पोंदे-भाला फेक द्वितीय,नवनाथ राहींज-उंच उडी तृतीय. तसेच १४ वर्षाखालील मुली . दिव्या प्रवीण केदारी-८० मीटर हर्डल्स प्रथम , १७ वर्षाखालील मुली-पायल प्रवीण केदारी-४०० मीटर धावणे द्वितीय अशी माहिती प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी दिली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक भरत खिलारी , पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील , उपाध्याक्ष रामदास वळसे पाटील,सचिव प्रकाश तापकीर व सर्व संचालक तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.