आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिंगवे (पारगाव) येथील भैरवनाथ विद्यालयाचे मैदानी स्पर्धत यश!!

शिंगवे (पारगाव) येथील भैरवनाथ विद्यालयाचे मैदानी स्पर्धत यश!!

प्रतिनिधी-शिंगवे पारगाव

आंबेगाव तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत श्री भैरवनाथ विद्यालय शिंगवे विद्यालयातील मुलांनी दहा पदके पटकवून तालुक्यामध्ये भैरवनाथ विद्यालय शिंगवे शाळेच्या विद्यार्थांनी घवघवीत यश मिळवत नावलौकिकात भर घातली असुन
मुलींनी देखील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत पाच पदके मिळवली.


विजय झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे दृष्टि कानसकर ८००m धावणे (१९) वर्ष मुली द्वितीय क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, श्रद्धा येळवंडे (१९) वर्ष मुली गोळा फेक तृतीय क्रमांक, सायली लंगे (१९) वर्ष वयोगट मुली १००m धावणे तृतीय क्रमांक ,संजना रोडे वय(१९) वर्ष मुली८००m धावणे तृतीय क्रमांक ,श्रद्धा येळवंडे (१९) वर्ष मुली लांब उडी तृतीय क्रमांक अशा पद्धतीने महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत १५पदकांची कमाई केली.


तसेच या १५ पैकी७ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.सर्व यशस्वी विद्यार्थांना क्रीडा शिक्षक तानाजी फुलमाळी यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी सर्व विद्यार्थांनचे विद्यालयाचे प्राचार्य दत्तु खाडे सर,संस्थेचे संचालक तुकाराम वाव्हळ,शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष बारकुशेठ जगताप,पोलिस पाटील गणेश पंडीत,उपसरपंच हिरामण गोरडे, ग्रा. प. सदस्य संतोष वाव्हळ, विकास सोसायटी चेअरमन भरत गाढवे,माजी क्रीडा शिक्षक दिलीप गोरडे, संदीपशेठ गाढवे,ग्रामस्थ,पालक यांच्या वतीने विद्यार्थांनचे अभिनंदन करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.