आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

अवैधरित्या पेट्रोल/डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन, लोणीकाळभोर पोलीसांनी ४८ लाख ०१ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त!!

अवैधरित्या पेट्रोल/डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन, लोणीकाळभोर पोलीसांनी ४८ लाख ०१ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त!!

पुणे (प्रतिनिधी :चंद्रकांत चौंडकर) :
लोणीकाळभार पोलीस ठाणे हद्दीतील अवैध पेट्रोल डिझेल चोरीचे अनुषंगाने मा. सहा. पोलीस आयुक्त साो. हडपसर विभाग, पुणे शहर यांचे आदेशान्वये दिनांक १०/०९/२०२४ रोजी राजु महानोर,सहा.पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर, पो.शि.१०११२ ढमढेरे, पो.शि. शिवाजी जाधव असे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीत पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध करणचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना राजु महानोर, सहा.पोलीस निरीक्षक व पो.शि.१०११२ ढमढेरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एचपीसीएल व आय.ओ.सी. एल.कपंनी कदमवाकवस्ती ता.हवेली येथुन पेट्रोल व डिझेल भरुन टॅकर पेट्रोलपंपाकडे जात असतात त्यावेळी त्यांना एचपीसीएल व आय. ओ. सी. एल. कंपनीकडुन प्रवास करण्याचा मार्ग, वेळ नियोजित केलेली असते. तसेच सदर टँकरमधुन ते टँकर कंपनीच्या बाहेर गेल्यानंतर इंधन बाहेर काढता येवु नये याकरीता टँकरला कंपनीचे लॉक करुन कंपनीचे बाहेर पाठविले जाते.असे असताना,मौजे कुंजीरवाडी थेऊर फाट्याजवळ (ता.हवेली,जि.पुणे) येथील पुणे सोलापुर असा दुतर्फा वाहनाऱ्या महामार्गाचे दक्षिणेस तुकाराम धुमाळ यांचे घराचे पाठीमागे रिकाम्या जागेतील पत्र्याच्या शेडजवळ टँकर घेवुन जावुन त्यामधुन पेट्रोल डिझेल या ज्वलनशील इंधन बॅरेल मध्ये काढीत आहे अशी मजकुराची खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच मा.अश्विनी राख,सपोआ, हडपसर विभाग व राजेंद्र करणकोट,वपोनि लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे शहर यांना कळविले असता,त्यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील तपास पथक अमोल घोडके,पोलीस उप निरीक्षक,लोणी काळभोर पो. स्टे. पुणे शहर, पो. हवा. २७२०, वणवे, पो.शि.३८५० धुमाळ, पो.शि. ३२९, विर, पो.शि १०३४५ पाटील यांना छापा कारवाईचा आशय समजाऊन सांगुन कारवाई करण्याचे आदेशित केले.

सदर आदेशान्वये नमुद ठिकाणी छापा १५/१० वा.चे दरम्यान छापा टाकला असता, सदर ठिकाणी आयओसिएल व एचपीसिएल असे एकुण ०३ इंधन टँकर, त्या टँकरमधुन इलेक्ट्रिक मोटारीचे साहाय्याने डिझेल बॅरेल मध्ये काढीत असताना मिळुन आले. सदर छापा कारवाईमध्ये एकुण १६२० लिटर डिझेल मिळुन आल्याने जप्त करण्यात आलेले आहे. त्यामुळ सदर पुढिल कायदेशिर कारवाई करीता आयओसिएल कंपनीचे अधिकारी व परिमंडळाचे पुरवठा अधिकारी यांना पत्रव्यवहार करुन समक्ष बोलाऊन घेतले.

सदर ठिकाणी मा.अश्विनी राख, सपोआ, हडपसर विभाग व राजेंद्र करणकोट, वपोनि लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी तात्काळ भेट दिली. सदर घटनेबाबत लोणीकाळभोर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.४४०/२०२४ बी. एन. एस. कलम १११, ११२, ३०३(२), ६१ (२), ३१६ (३), २८७, २८८स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ३, ४, ५, ६ सह अत्यावश्यक वस्तु अधि. कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील अवैध रित्या पेट्रोल/डिझेलची चोरी करणारे इसमांची नावे १) शुभम सुशील भगत वय २३ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. बोरकरवस्ती. थेडुरुफाटा, ता. हवेली जि. पुणे २) तृशांत राजेंद्र सुंभे वय ३१ वर्षे धंदा- शेती रा. बँक ऑफ बडोदाजवळ, थेऊरुफाटा ता. हवेली जि. पुणे ३) रवी केवट वय २५ वर्षे धंदा मजुरी रा. बोरकरवस्ती, माळीमळा ता. हवेली जि. पुणे, ४) विशाल सुरेश गोसावी वय ३० वर्षे रा वाणीमळा थेडुर फाटा ता. हवेली जि. पुणे ५) किरण हरीभाउ आंबेकर वय ३१ वर्षे धंदा ड्रायव्हर रा. कदमावाकवस्ती ता. हवेली जि. पुणे ६) रोहीतकुमार वय २१ वर्शे धंदा मजुरी रा. बोरकरवस्ती माळीमळा ता. हवेली जि. पुणे, असे मिळुन आले असुन त्यांचेकडे तपास केला असता टँकर मालक ७) श्रीकांत ऊर्फ सोन्या राजेंद्र सुंबे रा. बँक ऑफ बडोदा शेजारी थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे, यांचे सांगणेवरुन पेट्रोल/डिझेलची चोरी करीत असल्याचे सांगितले असुन तो घटनास्थळावरुन छापा कारवाईची चाहुल लागल्याने पळुन गेलेला आहे. तसेच ८) प्रविण सिद्राम मडीखांबे रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे हा चोरीचे पेट्रोल/डिझेल काळया बाजारात विक्री करीत असल्याची माहीती प्राप्त झालेली आहे.

सदरची कामगिरी ही श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. आर. राजा, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ ५, पुणे शहर, श्री. निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त साो, गुन्हे पुणे शहर, श्री. अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त साो, हडपसर विभाग, पुणे शहर, श्री. राजेंद्र करणकोट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पो. स्टे. पुणे शहर, श्री राजु महानोर, सहा. पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर, अमोल घोडके, पोलीस उप निरीक्षक, लोणी काळभोर पो. स्टे. पुणे शहर, पो. हवा. २७२०, रामहरी वणवे, पो.शि. ८१०८ मंगेश नानापुरे, पो.शि.१०११२ मल्हार ढमढेरे, पो.शि. शिवाजी जाधव, पो. शि. ३८५० संदीप धुमाळ, पो. शि. ३२९ बाजीराव विर, पो.शि.१०३४५ योगेश पाटील यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.