आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा परिषद केंद्रशाळा धसईचे सहशिक्षक डॉ.हरिश्चंद्र तुकाराम भोईर ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित!!

जिल्हा परिषद केंद्रशाळा धसईचे सहशिक्षक डॉ.हरिश्चंद्र तुकाराम भोईर ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित!!

जिल्हा परिषद केंद्रशाळा धसई ता.शहापूर येथे कार्यरत असलेले डॉ. हरिश्चंद्र तुकाराम भोईर यांना ठाणे जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान. श्री.रोहन घुगे साहेब , मान.फडतरे साहेब , शिक्षणाधिकारी मान. दहितुले मॅडम या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

डॉ. हरिश्चंद्र भोईर सर यांनी आज पर्यंतच्या सेवा कालावधीत उत्तम शैक्षणिक व सामाजिक कार्य केले आहे. आपल्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक घडविले आहेत. आपल्या शैक्षणिक कार्यकाळात विविध शैक्षणिक संशोधनात्मक लेखन केले आहे. जाणीव प्रतिष्ठान , शहापूर तालुका नॉलेज अकॅडमी , आदिवासी उन्नती मंडळ अशा विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना , शाळांना उत्तम प्रकारे मदतीचा हात दिला आहे.

मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियानात जिल्हा परिषद केंद्रशाळा धसई शाळेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून देण्यात सरांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. डॉ. हरिश्चंद्र भोईर यांनी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर शिक्षक प्रशिक्षणात अनेक वर्ष तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. टेंभरे , वाऱ्याचापाडा व धसई येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवा कालावधीत शंभर टक्के प्रगतीचे उद्दीष्ट साध्य केले आहे.क्रीडा स्पर्धेत संघ जिल्हास्तरापर्यंत नेण्यात यशस्वी ठरले आहेत. वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता ,अंधश्रद्धा निर्मूलन, महिला मिळावे, मातृप्रबोधन वर्ग अशा विविध अभियानात सक्रिय सहभाग असतो.

भोईर सर करत असलेल्या या उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन पंचायत समिती शहापूर तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांतर्फे गुणगौरव करण्यात आला आहे. सरांच्या उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन ठाणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने डॉ. हरिश्चंद्र भोईर सरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.