आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात गणरायाला भावपुर्ण वातावरणात निरोप!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात गणरायाला भावपुर्ण वातावरणात निरोप!!

दहा दिवसांच्या गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप!!

प्रतिनिधी – समीर गोरडे

आंबेगाव तालुक्यात लाडक्या बाप्पांना मंगलमूर्ती मोरया.. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात सोमवारी भावपूर्ण वातावरणात रिमझिम पावसात दहाव्या दिवशी निरोप देण्यात आला. घरगुती गणेश मूर्तीचे शांततेत विसर्जन केले.

लाडक्या गणरायाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर शिंगवे व परिसरामध्ये गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिक लगबग सुरू होती. दरवर्षीप्रमाणे ढोल ताशांच्या गजरात,टाळ मृदुंग विठ्ठल विठ्ठल जयगोष म्हणत व पारंपारिक वाद्यात गणपती बाप्पा मोरया म्हणत जयघोषात भक्तीमय भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. यावेळी भीमाशंकर कारखाना संचालक नितिन वाव्हळ,पोलिस पाटील गणेश पंडीत,उपसरपंच हिरामण गोरडे,सोसायटी संचालक भिमाजी गोरडे,संदिप गोरडे,प्रभाकर गोरडे, धोंडीभाऊ गोरडे, अतुल गोरडे, आदि बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले होते.

पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस कर्मचारी यांनी गणेश विसर्जन घाट व मिरवणुकी दरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.