आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नायगाव(ता.पुरंदर) येथे प्रौष्ठपदी पौर्णिमा उत्सहात साजरी!!

नायगाव येथे प्रौष्ठपदी पौर्णिमा उत्सहात साजरी!!

पुरंदर(प्रतिनिधी : चंद्रकांत चौंडकर)

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथे प्रौष्ठपदी पौर्णिमा निमित्त भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
प्रौष्ठपदी पौर्णिमेनिमित्त पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कऱ्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले. हभप पुनमताई महाराज जाचक/कोलते(पिंपरी चिंचवड) यांच्या सुश्राव्य किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना गायन साथ आबा महाराज बोरकर, विनोद झेंडे, चांगण महाराज व मृदुंग साथ तेजस खेसे यांनी दिली.भजन साथ नायगाव भजनी मंडळाने दिली.श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापुजा पुजारी दिपक जगताप यांनी केली.अन्नदान ज्ञानेश्वर धर्माधिकारी, रघुनाथ वाळके, अतुल वाळके , हिरामण येवले,लक्ष्मण वाळके(पेरणे ), अमोल देवकर (गलांडवाडी), मयूर कोरडे (अजनुज), तानाजी लवांड, विश्वनाथ लवांड(हिंगणीगाडा), दत्तात्रय बोत्रे(यवत), भारत लोखंडे(केडगाव)यांच्या वतीने करण्यात आले.मंदिर परिसराची स्वच्छता,लाईट,पाणी,दर्शनबारी आदिंची उत्तम व्यवस्था श्री सिध्देश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने केल्याचे राहुल कड यांनी सांगितले.

श्री क्षेत्र नायगाव(ता.पुरंदर) येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची प्रौष्ठपदी पौर्णिमेनिमित्त बांधलेली आकर्षक महापुजा

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.