आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सी.बी.एस.ई झोनल २ योगासन स्पर्धेत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल मधील योगपटूची राष्ट्रीय स्तरावर निवड!!

सी.बी.एस.ई झोनल २ योगासन स्पर्धेत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल मधील योगपटूची राष्ट्रीय स्तरावर निवड

ठाणे – सी.बी.एस.ई.बोर्ड द्वारा आयोजित झोनल २ योगासन स्पर्धा ह्या सब ज्युनिअर , ज्युनिअर व सीनियर मुली व मुले झोनल योगासन स्पर्धा दि.१४ व १६ सप्टेंबर २०२४ रोजी एस.जे.आर. पब्लिक स्कूल कल्याण नगर बेंगलोर, कर्नाटक येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल मोहिली-अघई ता. शहापूर शाखेच्या आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल मधील एकूण १२ विद्यार्थ्यी सहभागी झाले होते.

या स्पर्धा पारंपारिक योगासन, आर्टिस्टिक योगासन, रिदमिक योगासन या प्रकारातून ह्या स्पर्धा झालेल्या होत्या. १७ वर्षा मुले या गटातून आर्टिस्टिक योगासन प्रकारात संत सुनील मांजे याने रौप्य पदक तेजस जय मेठल याने कास्यपदक ट्रॅडिशनल योगासने ग्रुप क्रीडा प्रकारात १४ वर्ष मुलींमध्ये इयत्ता ८ वी. मधील चेतना सोमनाथ साबळे, हर्षदा बाळू घोरपडे, शालिनी गणेश म्हसे, समीक्षा सुरेश मिरका व चैतन्या दिलीप भोईर ५ कास्यपदक १४ वर्ष मुले ट्रॅडिशनल योगासन ग्रुप क्रीडा प्रकारातून इयत्ता ८ वी. मधील हर्षित उमेश धांगडा, हर्षल महादू थोरात, आदित्य दिलीप खाडे व प्रीतम एकनाथ भोये या सर्व योगपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४ कास्य पदक मिळविले. एकूण ११ पदके मिळून या सर्व योगपटूंची सी.बी.एस.ई.राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलांची स्पर्धा सुरत, गुजरात व व मुलींचे स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर, अहमदनगर येथे दि. २ ते ५ ऑक्टोंबर २०२४ रोजी होणाऱ्या सी.बी.एस.ई राष्ट्रीय योगासन स्पर्धेकरिता निवड करण्यात आली.

या स्पर्धेला कर्नाटक,आंध्र प्रदेश महाराष्ट्र या राज्यातील अनेक सी.बी.एस.ई.शाळांच्या एकूण ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.

हे वृत्त समजताच,विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट ( कोकमठाण) संचलित, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब, स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील होणाऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच स्थानिक सदस्य अनंत गायकवाड, प्रवीण मोरे,शैक्षणिक संचालक डॉ. डी.डी. शिंदे , जनरल व्यवस्थापक गुलाब हिरे , आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री.अनिल पाटील, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पंकज बडगुजर , क्रीडा विभाग प्रमुख संदेश चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडा विभाग यांनी योगपटूचे कौतुक केले करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आला..या सर्व विद्यार्थ्यांसाठी योगशिक्षक श्री.पुरुषोत्तम पानबुडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.