आंबेगाव तालुक्यात कडाक्याची थंडी; वातावरणात गारठा!!
आंबेगाव तालुक्यात कडाक्याची थंडी; वातावरणात गारठा!!
प्रतिनिधी -समीर गोरडे
आंबेगाव तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये थंडीचा प्रवाह वाढल्यामुळे हा प्रवाह सध्याच्या घडीला पोषक हवामान असल्यामुळे एक दोन दिवसांत गारठा आणखीन वाढणार असल्याचे संकेत सध्याच्या वातावरणावरून मिळत असुन डिसेंबर महिन्याचा शेवट थंडीनेच होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या थंडीचे प्रमाण वाढल्याने पहाटे शाळेत जाणारे विद्यार्थी, ऊसतोड मजूर, थंडी पासुन संरक्षक व्हावे म्हणून स्वेटर, जर्कींग, हातमोजे,शुजचा वापर करीत आहेत परंतु थंडी कडाक्याची असल्याने अनेक जण शेकोट्यांनचा आधार घेत असल्याचे चित्र दिसत असुन शिंगवे येथील सकाळीच बाहेर गावी शाळेला जाणारे विद्यार्थी शाळेत जाताना अक्षरशः शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत.
वातावरणात बदल झाले असून, किमान आणि कमाल तापमानात घट होताना दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून आणि येत्या काही दिवसांमध्येही देशासह राज्यात थंडीसाठी पूरक वातावरण राहणार असून, गुलाबी थंडी बोच-या थंडीचे रूप धारण करू शकते.
नागरिकांना पहाटेच्या वेळी गारवा आणि दुपारी उष्मा अशा विचित्र हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. बहुतांश भागात आणखी थंडी वाढेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
थंडीचा कडाका जसजसा वाढत जाईल तसे रात्रीच्या वेळी तरुणाईचे शेकोटी पेटवुन गप्पांचे फड रंगल्याचे दृश्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे अशाही स्थितीत शेतकरी रात्री शेतात काम करताना दिसुन येतात.तसेच ऊसतोड मजूर शेतात येऊन पहाटे चार पाच वाजता ऊस तोडणी करताना दिसत आहेत..
शिंगवे येथील बाहेर गावी शाळेला जाणारे विद्यार्थी शेकोटी घेताना..