मौजे गुळुंचवाडी येथे श्रमनानातून वनराई बंधारा..
मौजे गुळुंचवाडी येथे श्रमनानातून वनराई बंधारा..
प्रतिनिधी-जुन्नर समीर गोरडे
जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी येथील ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले तालुका कृषी अधिकारी जुन्नर भोसले साहेब , मंडळ कृषी अधिकारी प्रमिला मडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुळुंचवाडी कृषी सहाय्यक सुजाता खेडकर यांच्या उपस्थित परिसरातील शेतकरी बांधवांनी श्रमदानातून हे बंधारे बांधले. वनराई बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते तसेच शिवारातील विहिरी, बोरवेल यांच्या पाण्याची पातळी सुद्धा वाढते. रब्बी पिकांना संरक्षित पाणी म्हणून देता येते .जनवारे पशुपक्षी यांना पाणी पिण्याची सोय होते अशा प्रकारची माहिती मंडळ कृषी अधिकारी बेल्हे श्रीमती प्रमिला मडके यांनी दिली यावेळी प्रगतशील दत्ता भांबेरे, किरण जाधव, गोरक्ष जाधव,संतोष जाधव, मंगेश जाधव, दिपक जाधव, बबन जाधव ,रामदास काळे, नामदेव अग्रे आदी शेतकरी उपस्थित होते..