सिध्दनेर्ली येथे राबवली वृक्ष प्रसाद संकल्पना!!
सिध्दनेर्ली येथे राबवली वृक्ष प्रसाद संकल्पना!!
सिध्दनेर्ली ता.कागल येथे माऊली तरूण मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे गणेशोत्सव विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. त्या प्रमाणे यंदाही मंडळाचे वतीने महाआरतीवेळी वृक्ष प्रसाद योजना हा अभिनव उपक्रम राबवून साजरा केला.या वेळी महाआरतीस उपस्थित असणाऱ्या प्रत्येकास मंडळाचे वतीने गणेशाचा प्रसाद म्हणून वृक्ष भेट देण्यात आले.
या वृक्षाचे रोपण करून चांगल्या पद्धतीने संगोपन करतील त्यांना पुढील वर्षी निसर्ग व पर्यावरण संघटना व माऊली तरूण मंडळाचे वतीने एक फळझाड वृक्ष प्रसाद म्हणून भेट दिला जाणार आहे.हा उपक्रम राबवण्यासाठी मंडळाचे सदस्य नृसिंह घराळ व के. बी. घराळ सर यांचे विशेष योगदान मिळाले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर येवलुजे होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,माऊली तरूण मंडळाने राबविलेल्या वृक्ष प्रसाद उपक्रमामुळे सिध्दनेर्ली करांनी हाती घेतलेल्या वृक्षारोपण व संगोपन चळवळीस बळकटी मिळाली आहे.या उपक्रमाचा आदर्श इतर मंडळानी घेतल्यास पर्यावरण वाचण्यास व पर्यावरण संवर्धनास नक्कीच मदत होईल.
या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार,उपाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या सह नृसिंह घराळ, दादासो पाटील,नितीन पाटील,के.बी.घराळ ,धनाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.संगिता जमिनीक यांनी केले तर आभार विशाल जमिनीक यांनी मानले.