आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

वाडीपीर येथे मूर्तीदान, निर्माल्य संकलन!!

वाडीपीर येथे मूर्तीदान, निर्माल्य संकलन!!

कोल्हापूर प्रतिनिधी:-वाडीपीर येथे प्रतिवर्षाप्रमाणे प्रदूषणमुक्त गाव आणि पर्यावरण पूरक गणेश विसर्जनासाठी केलेल्या आव्हानाला ग्रामस्थांनी भरपूर प्रतिसाद दिला. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती घरगुती गणेश मूर्ती वाडीपीर येथे मूर्ती दान झाले.

गुरुवारी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत ग्रामपंचायत च्या दारामध्ये कृत्रिम विसर्जन कुंड व काहीलीची व्यवस्था केली होती. सायंकाळी अंदाजे एक टन निर्माल्य संकलन करून ट्रॅक्टर डंपर मधून इराणी खनी मध्ये प्रशासनाला सुपूर्द केले. वाडीपीर हद्दीतील ग्रामस्थांसह आसपासच्या नवीन कॉलनीतील निर्माल्य संकलन करून प्रशासनास सुपूर्द केले. यावेळी, वाडीपीर गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य, ग्रामपंचायत शिपाई व मोठ्या प्रमाणावर ती ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.