आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी आग लावणाऱ्यांपेक्षा आग विझवणाऱ्या चिमणी प्रमाणे कार्य करावे:- ह.भ.प.प्रभाकर महाराज कराळे

शिरदाळे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न!!

विद्यार्थ्यांनी आग लावणाऱ्यांपेक्षा आग विझवणाऱ्या चिमणी प्रमाणे कार्य करावे:- ह.भ.प.प्रभाकर महाराज कराळे

शिरदाळे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न!!

सालाबादप्रमाणे आदर्श ग्रामपंचायत शिरदाळे व गणेश मित्र मंडळ शिरदाळे यांच्या वतीने १० वी,१२ वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. गावातील विद्यार्थी दशेतील मुलांना कौतुकाची थाप म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेली चार वर्षे हा उपक्रम सुरू असून यावर्षी देखील हा दिमाखदार सोहळा अतिशय थाटामाटात संपन्न झाला.पारगाव पोलीस स्टेशनचे PSI मा.लोहकरे साहेब आणि वारकरी संप्रदायाचे भूषण आणि ज्ञानदानाचे कार्य करत असलेले ह.भ.प.प्रभाकर महाराज कराळे हे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी नुकतीच एस.आर.पी.एफ मध्ये पोलीस शिपाई म्हणून निवड झालेल्या कु.अभिषेक तांबे यांचा देखील सन्मान करण्यात आला. त्याच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी तो सन्मान स्वीकारला.


यावेळी बोलत असताना शिरदाळे गाव हे अतिशय सुंदर व निसर्गरम्य गाव असून या भागात येण्याचा योग कमी येतो कारण इकडच्या तक्रारिंचे प्रमाण अतिशय कमी असते. तसेच गणेशोत्सव देखील शांततेत संपन्न होत असतो. विसर्जन मिरवणूक देखील अशीच शांततेत संपन्न करण्याचे आवाहन यावेळी मा. लोहकरे साहेबांनी केले.
तर ह.भ.प.प्रभाकर महाराज कराळे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना डोंगराला लागलेल्या आगीचे उदाहरण देत असताना ज्यावेळी चिमणी आपल्या चोचीत पाणी घेऊन जाते त्यावेळी हसणाऱ्या कावळ्याला दिलेले उत्तर होते की ज्यावेळी या डोंगराचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझे नाव हे आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल आणि हेच काम आजच्या विद्यार्थ्यांनी करायचे आहे. आपले कार्य हे त्या चिमणी प्रमाणे करत राहायचे आहे यश हे नक्की मिळत असते. त्याच प्रमाणे हल्लीची गणेश मंडळ असा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत आणि त्याला ग्रामपंचायत देखील सहकार्य करत आहे ही अतिशय मोलाची आणि आनंददायी गोष्ट आहे.

आपली संगत देखील खूप महत्त्वाची असते कारण त्यावरून आपले मूल्यमापन होत असते. कारण प्रसादमध्ये असणारा फुटना हा प्रसाद म्हणून खाल्ला जातो तर चकना म्हणून खाल्ला जाणारा फुटना हा दारू पिण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे आपल्या संगती जशा असतील तसे आपले मूल्यमापन होत असते. अशा अनेक विषयांवर महाराजांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ह.भ.प.तान्हाजी महाराज तांबे,संतोष रणपिसे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.


तसेच या कार्यक्रमानंतर सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्ताने महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाला. गावातील अनेक महिलांनी यात सहभागी होत या खेळाचा आनंद लुटला. या खेळाचा विजेत्या ठरल्या सौ.सविता संदीप मिंडे तर उपविजेत्या ठरल्या सौ.अलका कल्पेश सरडे. दोघींचा सन्मान यावेळी ज्यांनी बक्षीस दिले ते श्री.गणेश चौधरी व कु.निखिल तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

तर यावर्षी गणेश मंडळाला गणेश मूर्ती दिल्याबद्दल श्री.रामदास ज्ञानेश्वर तांबे यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.


यावेळी मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे,गणपती मंडळाचे अध्यक्ष शंकर तांबे,मा.चेअरमन कांताराम तांबे,कोंडीभाऊ तांबे,मा.सरपंच वंदना तांबे,पोलीस पाटील सौ.कल्पना चौधरी,भाऊसाहेब करंडे ,कल्पेश सरडे,गणेश चौधरी,गणेश मंडळाचे सदस्य सिद्धार्थ तांबे,कुणाल तांबे,रोहित रणपिसे,शुभम तांबे,श्रीनाथ तांबे,किशोर रणपिसे, सुदर्शन चौधरी,ओम चौधरी,राज तांबे तसेच ग्रामस्थ महिला भगिनी सर्व सत्कारमूर्ती विद्यार्थी उपस्थित होते. उपसरपंच बिपीन चौधरी यांनी प्रास्ताविक केले.मयुर सरडे यांनी यांनी सूत्रसंचालन केले तर अनिकेत चौधरी यांनी आभार मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.