आंबेगाव तालुक्यातील भैरवनाथ विद्यालय शिंगवे(पारगाव) येथे तालुकास्तरीय स्पर्धचे आयोजन!!
भैरवनाथ विद्यालय शिंगवे येथे तालुकास्तरीय स्पर्धचे आयोजन!!
प्रतिनिधी-समीर गोरडे
जिल्हा क्रिडा परिषद,जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत आंबेगाव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय शिंगवे येथे आयोजन करण्यात आले. खो खो स्पर्धेचे उद्घघाटन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बारकूशेठ सखाराम जगताप यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक तुकाराम वाव्हळ गुरुजी,अशोक तिवारी, क्रिडा अधिकारी सोनलकर, मा.पोलीस निरीक्षक शांताराम वाव्हळ, उपसरपंच हिरामण गोरडे ,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितीन वाव्हळ, भैरवनाथ पतसंस्था संचालक हनुमंत तागड,क्रांतिवीर पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब गोरडे,सोसायटी चेअरमन भरत गाढवे, शरद बँकेचे मा.संचालक सुदाम वाव्हळ ,मा. क्रीडा शिक्षक दिलीप गोरडे ,भैरवनाथ,विद्यालयाचे प्राचार्य खाडे सर, ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खो-खो स्पर्धा वयोगट चौदा,सतरा,ऐकोणीस वयोगटांच्या मुला मुलींचे खो खो स्पर्धेसाठी एकूण ६४ संघानी सहभाग नोंदविलेला होता.
खो खो स्पर्धेसाठी सन्मानचिन्ह ट्राफी मेडल स्व.कै.सखाराम सहादू जगताप यांचे स्मरणार्थ बारकूशेठ जगताप यांच्या तर्फ देण्यात आले.
सदर स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे चौदा वर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक नरसिंह विद्यालय रांजणी, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी.
चौदा वर्षे वयोगट मुली प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी,द्वितीय क्रमांक श्री भैरवनाथ विद्यालय शिंगवेसतरा वर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक श्री भैरवनाथ विद्यालय शिंगवे,द्वितीय क्रमांक श्री नरसिंह विद्यालय रांजणी सतरा वर्षे वयोगट मुली प्रथम क्रमांक नरसिंह विद्यालय रांजणी व द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव एकोणीसवर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यालय मंचर ,द्वितीय क्रमांक श्री भैरवनाथ विद्यालय शिंगवे एकोणीस वर्षे वयोगट मुली प्रथम क्रमांक अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर ,द्वितीय क्रमांक श्री भैरवनाथ विद्यालय शिंगवे
विजेत्या संघाना व खेळाडुंना बक्षीस वितरण पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लोहकरे साहेब, तनपुरे साहेब गव्हाणे साहेब,सूर्यकांत वाव्हळ साहेब ,मा.पोलीस निरीक्षक सुर्यकांत वाव्हळ, पोलीस पाटील गणेश पंडित,मा. उपसरपंच संतोष वाव्हळ,ग्रामपंचायत सदस्य नविना गाढवे, सोपान पाबळे ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वैजनाथ येंधे,अरुण गाढवे,प्रवीण गोरडे,सुहास गोरडे,सर्व संस्थांचे पदाधिकारी,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ यांचे हस्ते देण्यात आले. खो खो मैदान व्यवस्था क्रिडा शिक्षक तानाजी फुळमाळी यांनी पाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवदत्त जोरी सर, मंचरकर मॅडम यांनी केले, आभार थोरात सर यांनी मानले,स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ विद्यालय शिंगवे शाळेतील शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले..