खंडू बोडके-पाटील यांच्या निःस्वार्थी कार्यामुळे राजकीय भविष्य उज्ज्वल :- खासदार भास्करराव भगरे
खासदार भास्करराव भगरे याचा गोदाकाठवासियांच्यावतीने नागरी सत्कार
खंडू बोडके-पाटील यांच्या निःस्वार्थी कार्यामुळे राजकीय भविष्य उज्ज्वल :- खासदार भास्करराव भगरे
खासदार भास्करराव भगरे याचा गोदाकाठवासियांच्यावतीने नागरी सत्कार
निफाड (वार्ताहर) :- करंजगावचे माजी सरपंच व शासनाच्या राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील हे राजकारणातील निःस्वार्थी समर्पित व्यक्तिमत्व आहे. निफाड तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आधारवड असलेले खंडू बोडके पाटील यांच्या निःस्वार्थी कार्यामुळे त्यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्करराव भगरे यांनी केले. करंजगाव येथे खंडू बोडके पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा व खासदार भास्करराव भगरे सर यांच्या नागरी सत्काराप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अनिल आण्णा कदम होते. यावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे संचालक डॉ.प्रल्हाद डेरले, दिगंबर गिते, गोकुळ गिते, बापू गडाख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, प्रल्हाद गडाख, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, संदीप टरले, पंडित आहेर, संजय कुंदे, आनंद बिवाल, आशिष मोगल, सदाशिव खेलूकर, गटनेते रावसाहेब राजोळे, कचूआण्णा राजोळे, धोंडूमामा भगुरे, शहाजी राजोळे, शामशेठ जोंधळे, दौलत मुरकुटे, हभप जलाल महाराज सय्यद, विलास बोरस्ते, ॲड.कोल्हे, रामराव मोरे, सुरेश खैरनार, सरपंच नंदू निरभवणे, डॉ.नरेंद्र पाटील, शामआण्णा खालकर, भाऊसाहेब कमानकर, पुंजादादा भगुरे, नामदेव पवार, सोसायटी चेअरमन संदीप कोटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गोदाकाठवासियांच्यावतीने यावेळी खासदार भास्करराव भगरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाला जनतेने खासदार केले. गोदाकाठ त्यामध्ये अग्रभागी होता. गोदाकाठच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध असून तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी खासदार भगरे यांनी दिली. खंडू बोडके पाटील यांचे सपत्नीक यावेळी अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी बोलताना अनिल कदम म्हणाले की, सर्वसामान्य जनतेशी नाळ असणारे निष्ठावंत शिवसैनिकल खंडू बोडके-पाटील यांनी शासनाच्या राज्य बियाणे उपसमीतीवर काम करतांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीद तंतोतंत अमलात आणले आहे. त्यामुळे गोदाकाठमध्ये ते उदयोन्मुख नेतृत्व म्हणून खंडू बोडके पाटील उदयास आले आहे. अनेक मान्यवरांनी यावेळी खंडू बोडके पाटील यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. प्रास्ताविक नरेंद्र डेरले यांनी तर आभार सागर जाधव यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास आबा गडाख, निलेश दराडे, साहेबराव डेरले, संदीप दराडे, सुनील सोनवणे, लक्ष्मण चकोर, मोहन जगताप, किरण शिंदे, बंडू अडसरे, रघुनाथ ढोबळे, औरंगपूर सरपंच भाऊसाहेब खालकर, रामदास खालकर, योगेश गावले, संदीप फड, सोनगाव सरपंच दीपक कांडेकर, बस्तीराम खालकर, संतोष कडभाने, अर्जुन सांगळे, शाम कडवे, बाळासाहेब पावशे, चंदूकाका राजोळे, शरद जाधव, सुरेश गांगुर्डे, अनिल जोगदंड, वसंतभैय्या राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू भास्कर राजोळे, प्रवीण पाटील राजोळे, भरत पगार, विजय निरभवणे, संदीप गायकवाड, धोंडू पवार, योगेश राजोळे, रमेश राजोळे, सोमनाथ भगरे, आप्पासाहेब राजोळे, हेमंत दिघे, रमजू तांबोळी, लक्ष्मण पावशे, मंगेश गायकवाड, सुदर्शन राजोळे, सुकदेव कोटकर, विलास राजोळे, सुनीता राजोळे, नंदू शांताराम राजोळे, संतोष देवकर, गोरख राजोळे, संतोष पवार, संतोष राजोळे, निलेश राजोळे, सोमनाथ बोडके, गणपत भगुरे, हेमंत टिळे, नंदू भगुरे, पोपट राजोळे, अर्जुन भगुरे, गणेश गोसावी, ज्ञानेश्वर उगले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील यांचे अभिष्टचिंतन करताना खासदार भास्करराव भगरे, माजी आमदार अनिल आण्णा कदम, गोकुळ गिते, डॉ. जलाल महाराज सय्यद व इतर मान्यवर.
करंजगाव येथे खासदार भास्करराव भगरे सर यांच्या नागरी सत्काराप्रसंगी बोलताना माजी आमदार अनिल कदम, व्यासपिठावर गोकुळ गिते, डॉ. प्रल्हाद डेरले, गौरव पानगव्हाणे व इतर मान्यवर.!