धामणी(ता.आंबेगाव) च्या खंडोबा देवस्थानाला संगमरवरी “जयविजय ” शिल्पे अर्पण!!
धामणी(ता.आंबेगाव) च्या खंडोबा देवस्थानाला संगमरवरी “जयविजय ” शिल्पे अर्पण!!
धामणी ( ता.आंबेगाव)येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाचे महात्म्य खूप मोठे आहे.नगर,नाशिक व पुणे जिल्ह्यातील भाविक येथे तळीभंडार करण्यासाठी येतात.देवस्थानाने विविध विकास कामे करुन मंदिर व परिसर सुशोभित केलेला आहे असे गौरवोदगार भिमाशंकर साखर कारखान्याचे संचालक व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकित अर्जुनराव जाधव (नांदूर) यांनी केले.
श्रावण वद्य सोमवती अमावस्येच्या दिवशी सोमवारी (२ सप्टेंबर) येथील खंडोबा देवस्थानाच्या”मल्हार” महाद्बाराच्या दोन्ही बाजूला जयपूर (राजस्थान) येथून चांडोह (ता. शिरुर) येथील बबन अर्जुन भुमकर व ठाणे (मुंबई) येथील प्रा.राजाराम बबन विधाटे यांनी आणलेल्या साडेपांच फूट उंचीचे संगमरवरी “जयविजय” शिल्पाचे अर्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
धामणी ग्रामस्थांनी व भाविकांनी लोकवर्गणीतून श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिराचे जिर्णोध्दाराचे काम हाती घेऊन पारंपारिक व पुरातन वारसा चांगल्या प्रकारे जतन केलेला आहे.त्यांनी मंदिर व परिसराची व मंदिरात सुरु असलेल्या जिर्णोध्दार कामाची पाहाणी करुन समाधान व्यक्त केले.मंदिरातील दर्शन बारी व सभामंडप,जागरण देवकार्य मंडप शिखर नूतनीकरण मंदिर परिसरात अश्व,वाघ,सिंह,बैल,गायवासरु,हत्ती व जयविजय यांची संगमरवरी शिल्पे बसवून तसेच मंगलकार्यासाठी बांधण्यात आलेला कुलस्वामी सभामंडप आदी कामे करुन मंदिर आणि परिसराचा चेहरामोहरा बदलला असल्याचे व मंदिर जिर्णोध्दारासाठी नांदूरचे जाधव कुटुंबिय सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदूर (ता.आंबेगाव) येथील जाधव कुटुंबिय यांचे मूळगांव श्रीक्षेत्र धामणी हे असून आमच्या दोन पिढ्या धामणीहून नांदूरला स्थलातंरीत होऊन तिथे स्थायिक झाले.नांदूरकर मंडळीचे धामणीचे खंडोबा देवस्थान कुलदैवत असून माघ पौर्णिमा,चंपाषष्ठी,सोमवतीला दर्शनासाठी व देवकार्यासाठी येत असतात. सोमवतीचे शाहीस्नान,पालखी मिरवणूक व भाविकांसाठी महाप्रसाद सुविधा यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जयविजय संगमरवरी शिल्पाची पूजा श्री.बबनराव भुमकर व सौ.शंकुतला भूमकर आणि प्रा.राजाराम विधाटे व सौ.स्वाती विधाटे यांच्या हस्ते करण्यात येऊन ही शिल्पे देवस्थानाला सोमवतीच्या मुहर्तावर भाविकांच्या उपस्थितीत अर्पण करण्यात आली.
यावेळी आंबेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान वाघ,देवस्थानाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,धामणीचे सरपंच सौ.रेश्मा बोर्हाडे,पहाडदर्याचे सरपंच मच्छिंद्र वाघ,उपसरपंच कैलास वाघ,वामनराव जाधव,उत्तम जाधव,वसंत जाधव,शिरदाळ्याचे मा. सरपंच गणेश तांबे,आनंदराव जाधव, मा.उपसरपंच मयुर सरडे,सेवेकरी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,शांताराम भगत,धोंडीबा भगत,पांडुरंग भगत,राजेश भगत,प्रमोद देखणे,बाबुराव सोनवणे उपस्थित होते.