निसर्गसुंदर थळ सामाजिक संस्था आयोजित “कै. विक्रम स्मृती वृक्षारोपण अभियान ” थळ डोंगरी येथे संपन्न.
निसर्गसुंदर थळ सामाजिक संस्था आयोजित “कै. विक्रम स्मृती वृक्षारोपण अभियान ” थळ डोंगरी येथे संपन्न.
दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी, दुपारी ३ ते ५ या वेळेत, थळ डोंगरी येथे आपल्या संस्थेचे वृक्षारोपण योजनेचे आधारवड कै. विक्रम विजय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ “कै. विक्रम स्मृती वृक्षारोपण अभियान ” राबविले गेले, आपल्या संस्थेचे सभासद विक्रम म्हात्रे यांचं काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झालं त्यामुळे संस्थेचे कधीही न भरून निघणार नुकसान झालं आहे, त्यांचे वृक्षारोपण मोहिमेतील अमूल्य योगदान आणि झाडांच्या रुपात स्मृती जपल्या जाव्यात म्हणून आपण संस्थेच्या वृक्षारोपण मोहिमेला त्यांचं नाव दिलं आहे. काल झालेल्या द्वितीय वर्ष वृक्षारोपण कार्यक्रमात १०१ झाडें लावली गेली. यावेळी संस्थेचे सभासद आणि थळ गावातील स्वयंसेवक तसेच अलिबागमधील काही नागरिक उपस्थित होते.
संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी गणेशोत्सवा दरम्यान थळ गावातील समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठीआपण गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य संकलन कार्यक्रम हाती घेतला होता व या निर्माल्यावर आपण गांडूळखत प्रक्रिया केली व यावर्षी उत्तम असे गांडूळखत तयार झाले त्याचा वापर आपण लावलेल्या झाडांसाठी केला गेला. हे नैसर्गिक खत वापरून आपण निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अवधूत सप्रे, उपाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, सेक्रेटरी योगेश घरत, खजिनदार संतोष सप्रे, वृक्षारोपण प्रमुख सुरेंद्र घरत आणि कमिटी सदस्य श्री. मंगेश कवळे, श्री. संचित म्हात्रे, सौ. श्वेता घरत, सौ. सायली टंडन, शफी झेंडेकर, वैद्यकीय सल्लागार डॉ. राजाराम हुलवान आणि सभासद श्री. योगीराज सप्रे, श्री. सुरेंद्र घरत, सौ.स्वाती म्हात्रे व गावातील आणि अलिबाग मधील नागरिक उपस्थित होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी संस्थेला कै. विक्रम विजय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ १०१ झाडें त्यांच्या म्हात्रे परिवार यांजकडून देण्यात आली. स्वागत गुलाबपुष्प आणि नाश्त्याची व्यवस्था सौ. श्वेता योगेश घरत आणि चहाची व्यवस्था सौ.मेघा सुरेंद्र घरत यांच्यातर्फे करण्यात आली होती. पनवेल वरून झाडें आणण्यासाठी टेम्पो ची व्यवस्था शफी झेंडेकर यांनी केली .झाडांसाठी ५० किलो सुफला खताची व्यवस्था श्री. मंदार घरत यांनी केली.सर्वांचे संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.