आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात तमाशाप्रेमी व कलावंत श्री.दिनकर रोकडे यांनी साकारला संगितरत्न मा. दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा देखावा!

आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात तमाशाप्रेमी व कलावंत श्री.दिनकर रोकडे यांनी साकारला संगितरत्न मा. दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा देखावा!!
आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात तमाशाप्रेमी व कलावंत श्री.दिनकर रोकडे यांनी संगितरत्न मा. दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा देखावा साकारला आहे.
धामणी गाव कलावंतांची भुमी आहे. धामणी गावामध्ये अनेक दिग्गज कलाकार घडुन गेले आहेत. विशेषत म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये स्व. शाहिर शंकरराव जाधव धामणीकर यांच्या जिवनावर काही विद्यार्थींनी स्वतंत्र प्रबंध सुद्धा लिहिला आहे व तो अभ्यासासाठी उपलब्ध आहे. याचा धामणी ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. धामणी गावचे आदर्श व्यक्तीमत्व श्री. दिनकर रोकडे यांच्या घरचा गणपती समोर नेहमी काहीतरी वेगळ आणि आकर्षक देखावा सादर केला जातो. तस पाहिले गेले तर दिनकर रोकडे हे सुद्धा कलाप्रेमी व कलाकार आहेत.
ते दरवर्षी महाराष्ट्रातील नामवंत तमाशा फडांचा देखावा सादर करत असतात. याहीवर्षी संगितरत्न दत्ता महाडीक पुणेकर यांचा लोकनाट्याचा देखावा साकारला आहे. धामणी गावाच्या सुप्रसिद्ध श्री. कुलस्वामी कुलदैवत म्हाळसाकांत खंडोबा यात्रेच्या निमित्ताने जुन्या काळी सतत कित्येक वर्षे संगितरत्न दत्ता महाडीक पुणेकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होत होता धामणी गावावर स्व. दत्ता महाडीक पुणेकर यांचे विशेष प्रेम होते.
दिनकर रोकडे यांच्या घरी गणपती पुढील देखावा पाहण्यासाठी भाविक व रसिकांची मोठी गर्दी होत आहे.
या पूर्वी रोकडे यांनी मंगला बनसोडे करवडिकर सह नितीनकुमार बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा देखावा सादर केला होता. त्यांचे हे देखावे पाहण्यासाठी तमाशा क्षेत्रातील विवीध मान्यवर व लोककलावंत भेट देत असतात. या पूर्वी त्यांचा देखावा पाहण्यासाठी बापू बिरू वाटेगावकर स्वतः आले होते.वसंत अण्णा जगताप, विनोद महाडिक पुणेकर या वर्षीचा देखावा पाहण्यासाठी येणार असल्याचे रोकडे यांनी सांगितले.