आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मेंगडेवाडी-निरगुडसर रस्त्यावरील पुलाला पडले भगदाड!!

मेंगडेवाडी-निरगुडसर रस्त्यावरील पुलाला पडले भगदाड!!

मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मेंगडेवाडी निरगुडसर रस्त्यावरील मेंगडेवाडी येथील जुनी स्मशानभूमी जवळील ओढ्यावरील असणाऱ्या पुलाच्या पाईपला अनेक महिन्यापासून भगदाड पडले असून हा रस्ता निरगुडसर, जवळे, भराडी, नागापूर, थापलिंग इत्यादी भागातील प्रवाशी संख्या मोठ्या प्रमाणात ये-जा करत असून या पुलावर दोन – तीन किरकोळ अपघात देखील या खड्यामुळे झालेले आहेत.

दररोज सुमारे शेकडो लहान मोठी वाहने प्रवास करत असतात बांधकाम विभागाने मोठा अपघात होण्याआधीच हा खड्डा लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावा व अपघात टाळावा व या पुलाला वळण असल्याने या ठिकाणी गतिरोधक देखील बसवावे तसेच कठडे देखील बसवण्यात यावे असे युवसेनेचे जिल्हा समन्वयक सुनील गवारी व स्थानिक ग्रामस्थांची मागणी होत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.