शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) हिवाळी शिबीर संपन्न!!

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) हिवाळी शिबीर संपन्न!!
गेल्या सात दिवसांपासून शिरदाळे ता.आंबेगाव येथे सुरू असलेले दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) हिवाळी शिबीराचा आज समारोप करण्यात आला.
दि.४ जानेवारी रोजी या शिबिराचा शुभारंभ भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तथा भीमाशंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.भगवानराव बेंडे पाटील तसेच व्हा.चेअरमन मा.श्री.प्रदीपदादा वळसे पाटील आणि सर्व संचालक मंडळाच्या शुभहस्ते करण्यात आला होता. यावेळी शिरदाळे गावातील ग्रामस्थांवर आणि सर्व तरुण सहकाऱ्यांवर विश्वास ठेवून या शिबिराचे आयोजन शिरदाळे येथे आयोजित करण्यात आल्याचे चेअरमन आणि व्हा.चेअरमन यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.थोरात सर,मा.श्री.चव्हाण सर,मा.श्री.वसंतराव जाधव पाटील,मा.सरपंच श्री.मनोज तांबे,मा.सरपंच श्री.गणेश तांबे,मा.उपसरपंच श्री.मयुर सरडे,सोसायटी संचालक जयदीप चौधरी,मा.चेअरमन कांताराम तांबे,कोंडीभाऊ तांबे,ह.भ.प.तान्हाजी महाराज तांबे,जयश्री तांबे, बाळासाहेब रणपिसे,सुभाष तांबे,विलास तांबे,बाळासाहेब चौधरी,सखाराम तांबे,प्रभाकर तांबे तसेच ग्रामस्थ आणि तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली सात दिवस सर्व स्वयंसेवकांनी गावात स्वच्छता,झाडांना पाणी,शिवार भेट,सकाळी व्यायाम,व्याख्यानमाला,चर्चासत्र आशा विविध उपक्रमांचा समावेश करून हे शिबीर अधिक उत्साही बनविले होते. यात विद्यमान उपसरपंच मा.बिपीन चौधरी यांचे देखील व्याख्यान संपन्न झाले. गावातील ग्रामस्थांशी एकरूप होऊन सर्व विद्यार्थ्यांनी गेली सात दिवसांत एक आगळेवेगळे नाते ग्रामस्थांशी जोडले होते.तर दि.८/०१/२५ रोजी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यात महाविद्यालयातील तरुण तरुणींनी सहभागी होत सुंदर नृत्य सादर केली.त्याला शिरदाळे गावातील लहान मुलांनी सहभागी होत त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या शिबिराचा समारोप भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक मा.श्री.रामचंद्र ढोबळे आणि मा.श्री.बाळासाहेब घुले या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर श्री.थोरात सर होते. यावेळी सर्व मान्यवरांनी हे शिबीर शिरदाळे गावात यशस्वीरीत्या संपन्न केल्याबद्दल ग्रामस्थांचे,ग्रामपंचायत सरपंच आजी माजी पदाधिकारी सर्वांचे धन्यवाद मानले.
यावेळी मा.सरपंच मनोज तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे,मा.चेअरमन कांताराम तांबे,कोंडीभाऊ तांबे,शिवाजी सरडे,बाळासाहेब तांबे,मुख्याध्यापक श्री.दिलीप गाढवे सर,अंगणवाडी सेविका श्रीमती शांताबाई चौधरी,जयश्री रणपिसे हे उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या वतीने देखील सर्व विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था ग्रामस्थांनी व्यवस्थितरीत्या पाहिल्याबद्दल ग्रामस्थांचे देखील आभार मानण्यात आले.तर सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी प्राध्याकाप राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीर प्रमुख मा.संजीवनी टाके मॅडम,प्राध्यापक मा.श्री.डोळस सर,प्राध्यापक श्री.इनामदार सर आणि प्राध्यापक श्री.पानसरे सर यांनी पाहिली. तर त्यांना स्वयंपाक बनवण्याची व्यवस्था आचारी सुभाष जाधव यांनी पाहिली.
यावेळी विशेष सहकार्य केल्याबद्दल श्री.मच्छिन्द्र चौधरी,हनुमंत तांबे,विक्रम तांबे,तात्याभाऊ चौधरी,अनिकेत चौधरी,सिद्धार्थ तांबे,वसंत तांबे,कुणाल तांबे या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. तर जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी शाळा यांनी विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक मा.श्री.डोळस सर यांनी तर आभार संजीवनी टाके मॅडम यांनी मानले.