ताज्या घडामोडीसामाजिक

दैवत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती!!

पंढरपुरातील ग्रेट भेट!!

दैवत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!!पंढरपुरातील ग्रेट भेट!!

माऊलींची व तुकोबारायांची वारी चालू झाली की, उभ्या महाराष्ट्राला वाटतं चला आता विठुरायाचे दर्शन घेऊ .तसेच आमचेही बारा-तेरा वर्षे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सगळे मित्रमंडळी बायका पोरांसहित विठुरायाच्या दर्शनासाठी गेलो !आदल्या दिवशी सासवड येथे पालखीत माऊलींचे दर्शन घेतलं ,नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत ,आदिमाया शक्ती तुळजाभवानीचे दर्शन घेतलं .तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं .ऊर्जा निर्माण झाली शरीरामध्ये! त्या दिवशी आम्ही पंढरपुरामध्ये देवस्थाने तयार केलेल्या भक्तनिवासामध्ये मुक्काम केला. खरं म्हणजे भक्तनिवासात गेल्यानंतर एखाद्या ५ स्टार हॉटेलमध्ये जशी सोय असते, जसा लुक असतो ,तस देवस्थाने अत्यंत सुंदर भक्तनिवास बनवल आहे .संध्याकाळी चंद्रभागेमध्ये आंघोळ केली. पुंडलिकाचे दर्शन घेतलं, बाहेरूनच पांडुरंगाच्या मंदिराचे कळसाचे दर्शन घेतलं ,व आम्ही भक्तनिवासामध्ये गेलो सात्विक आहार व पाहुणचार घेतला आणि गप्पा मारता मारता झोपी गेलो.


आम्ही बरोबर तीन वाजता उठलो .सकाळची सगळी क्रिया कर्म उरकून बरोबर पावणेचार वाजता विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गेलो .गेल्यानंतर पूजेला सुरुवात झाली होती .पहिल्यांदा विठुरायाला धुपाने दिव्याने ओवाळले. तदनंतर पंचामृताने दुग्धाभिषेक केला ,देवाला अंघोळ घातली, नंतर देवाला नवीन वस्त्र परिधान केले .तुळशीची माळ, फुलांची माळ घालून कपाळी चंदनाचा टिळा लावला. डोक्यामध्ये टोप घातला .तोही सोनेरी. या रूपामध्ये पांडुरंगाला पाहून डोळ्याची पारने फिटली.नंतर सुंदर अशी देवाची आरती झाली . देवाला नैवेद्य दिला गेला .
खरं म्हणजे हे सगळं होत असताना त्या ठिकाणी जवळजवळ दोन तास एक 70 ते 75 वर्षाची आजी उभी होती .आणि प्रत्येक वेळी म्हणजे देवाची वस्त्रे काढताना, देवाला पंचमृताने आंघोळ घालताना ,देवाला नैवेद्य दाखवताना, देवाला कपडे घालताना ,देवाची आरती घेताना ,ही आजी त्या त्या वेळेस साजेसे अभंग म्हणत होती.त्या अभंगामुळे विठुरायाच्या त्या गाभाऱ्यामध्ये वातावरण मंत्रमुग्ध होत होते. या वयातही तिचा आवाज वाखाणण्याजोगा होता .भक्तीभक्ती म्हणजे काय हे आम्ही अत्यंत जवळून त्या ठिकाणी पाहिले .
आरती संपली, आम्ही विठुरायाचे दर्शन घेतले. आणि मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिलो. आजी बाहेर आल्या मी आजीला नतमस्तक होऊन पाया पडलो.

मी पाया पडल्यानंतर आमच्याबरोबर चे सगळेच लोकांनी तिचं दर्शन घेतलं. नंतर तिची विचारपूस केल्यानंतर गेले 22 वर्ष ती या मंदिरामध्ये विठुरायाची सेवा करते !रोज सकाळी दीड वाजता उठून चंद्रभागेच्या पलीकडे तिचं गाव ,आणि या गावातून चालत यायला मंदिरापर्यंत एक तास लागतो. आल्यानंतर सलग दोन तास ती पूजा होइ तोपर्यंत उभी असते. प्रत्येक वेळी अभंग म्हणते.येताना तुळशीचा हार व दोन फुले घेऊन येते .सगळी पूजा झाल्यानंतर देवाला नमस्कार करते. आणि पुन्हा एकदा आपल्या घरी निघून जाते. आम्ही तिला विचारलं हे किती दिवसापासून करता? तर ती बोलली आईचा वारसा आहे! गेली 22 वर्ष एकही दिवस खाडा न करता मी ही विठुरायाची सेवा करते…. हे सर्व लिहिताना शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माझ्या गावातील एका अवलियाची आठवण काढली नाही तर हा लेख अपूर्णच राहील !ते म्हणजे राजेंद्रजी शेळके साहेब…(मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टपंढरपूर )हे सगळे शक्य झाले फक्त साहेबांमुळे .साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे…
#अशा या पांडुरंगाच्या भक्ताला शतशः नमन#

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.