आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नाते कलेचे त्या रक्ताशी – तमाशा इतिहासातील सौंदर्य अप्सरा पवळा तबाजी भालेराव

बहुगुणी, बहुज्ञानी, रत्न पारखी रसिक मायबाप…
आपल्या सर्वांना त्रिवार ,मानाचा मुजरा करून,”नाते कलेचे त्या रक्ताशी”या लेखमालेतून तमाशा इतिहासातील सौंदर्य अप्सरा पवळा तबाजी भालेराव राहणार हिवरगाव पावसा,तालुका- संगमनेर, जिल्हा – अहमदनगर होय.

पवळा ताईंचा जन्म 12 ऑगस्ट 1870 साली झाला. त्यांचे लेख लिहीणे हे मी माझे भाग्य समजतो…..तिच्या वडिलांना पहिलीच सुंदर मुलगी झाली म्हणून, त्यांनी पवळाला खंडोबाला मुरुळी म्हणून सोडली.तिच्या चेहर्रावर इतके चंद्रबळ होते की,त्याची तूलनाच करता येणार नाही.पवळाही मुरळीच्या तालात चांगलीच तरबेज झाली.पूर्वीच्या त्या काळात मातीचा ओटा करून आणि रॉकेलच्या टेभ्यावर टाळ, तुंतुणे आणि ढोलकी, हलगी यांच्या संगीतावर जुने तमाशा फड चालत होते. नंतर पवळाने हरिबाबा घोलप यांच्या तमाशात प्रवेश केला. त्यावेळी तमाशात स्त्रिया नाचत नव्हत्या.पण पवळाला पाहिल्यावर तमाशाला रसिकांची खूप गर्दी जमू लागली, घोलप यांना गर्दी आवरेना म्हणून तमाशा बंद केला. त्यांनी धार्मिकता पत्करून कीर्तन चालू केले व रसिकांना समाज प्रबोधन करण्याचे ठरविले. पवळाचे वर्णन म्हणजे ती जणु काही इंद्राची अप्सराच होती.तिचे वर्णन शब्दात करणे सोपे नाही,आणि तिच्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरेच हे अगदी नक्कीच…..

त्याकाळी तमाशा फडात सर्व नाचे (पुरुष)नाचत होते.पण पवळा ही एकटीच देखणी स्त्री असल्यामुळे तिला बघण्यासाठी रसिक अतिशय गर्दी करत होते. नंतर मामा धुलवडकर यांच्या तमाशा फडात पवळा नाच काम करू लागली. तो तमाशा एकेकाळी मुंबईला गेला. त्याच वेळी शाहीर पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड,दगडू बाबा साळी, शिवा-संभा कवलापूरकर,शंकरराव अवसरीकर इत्यादी महाराष्ट्रात गाजलेले तमाशा फड होते . धुलवडकरांच्या तमाशा फडात पवळा नाचणारीन आहे. म्हणून मुंबईत वार्ता पसरली. तिला बघण्यासाठी रसिकांची तुडुंब गर्दी होऊ लागली, रसिक अवरेना म्हणून फड मालकाच्या नाकात दम येऊ लागला. त्याने गर्दीला कंटाळून तमाशा बंद केला, पवळाने मनात विचार करून शाहीर पठ्टे बाबुरावांच्या तमाशात पाय रोविला. नंतर त्या दोघांचे प्रेम संबंध वाढले.आता पवळा जणु शाहीर पठ्ठे बापुरावांचीच झाली होती.आता ही जोडी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कलेची खांद्यावर पताका घेऊन, रसिकांचे मनोरंजन करू लागले. रसिकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले, आणि एक नंबरचे नाव महाराष्ट्रात झाले.जुन्या लोकांच्या म्हणीप्रमाणे पान खाल्ले तर घशात दिसत होते. इतके सौंदर्य तिला ब्रह्मदेवाने दिले होते.एवढेच नाही तर ती नाचत असताना तिचे हावभाव, अदाकारी, पायत्रा गाण्याची ढब ही काही रसिकांच्या काळजात घर करून बसली होती.पवळाला बघितल्यावर रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते. पवळा ही नववारी साडी, दंड भरून चोळी, हातभर बांगड्या,कुंकू ,केसांचा अंबाडा हा पेहराव करून आली की रसिक मंत्रमुग्ध होत असे. पवळा बद्दल कितीही लिहिले आणि वर्णन केले तरी शब्द अपुरेच पडतील…..
पवळा च्या आईचे नाव रेऊबाई असे होते.शेवटी पठ्ठे बापुराव आणि पवळा यांच्यासारखे तमाशा इतिहास योगदान देणारे होणार नाही, हे अगदीच खरे….

या तमाशासृष्टी त शाहीर पट्ठेबापुरावांचे नाव घेतल्याशिवाय तमाशाला सुरुवातही होत नाही. आणि शेवटही होत नाही.कारण त्यांना कलावंतांचे आराध्य दैवत म्हणले जाते. एक आठवण ज्यावेळी,पवळा मुंबईहून संगमनेरला येत होती,तर तिला पावसा हिवरगावला गावी जाण्यासाठी एक टांगा पडदे लावून बनविलेला होता.शेवटी पठ्ठे बापूराव आणि पवळा यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद होऊन, तिचा भाऊ लक्ष्मण भालेराव यांच्या कडे राहण्यासाठी गेली .काही दिवसांनी शारीरिक आजार जडला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ती तारीख म्हणजे 6 डिसेंबर 1939 ही होय.

खरंच अशा महान कलावंतांचे हिवरगाव पावसा येथे स्मारक व्हावे,यासाठी अरुणराव खरात साहेब यांनी,महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे व महाराष्ट्र शासनाकडे नम्र विनंती केली आहे.तसेच महाराष्ट्र शासनाने पवळा पुरस्कार कलावंतांना चालू केला आहे. यात तीळ मात्र शंका नाही.

खरंच शाहीर पठ्ठे बापूराव कलावंतांचे दैवतआणि पवळा यांचे नाव तमाशा इतिहासात अजरामर राहील,त्याचप्रमाणे चंद्र-सूर्य असेपर्यंत राहील यात कसलीही शंका नाही. आशा या महान, थोर कलावंतांच्या दैवतास, त्रिवार अभिवादन करून,त्यांच्या न वर्णन करता येणाऱ्या जीवन प्रवासाला पूर्ण विराम देतो.त्यांचे नाव प्रत्येक रसिकांच्या कलावंतांच्या मुखात राहो.हीच ईश्वरचरणी प्रार्थना….
🙏🏻😊
लेखक ✍🏻
शाहीर खंदारे
ता.नेवासा.
मो.8605558432

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.