आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सावली सोशल सर्कल आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक स्पर्धा उत्साहात संपन्न!!

स्पर्धेमध्ये 280 स्पर्धकांचा सहभाग!! मुले आणि मुली यांच्या जलतरणाच्या 130 इव्हेंट चुरशीने पडल्या पार!!

सावली सोशल सर्कल आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक स्पर्धा उत्साहात संपन्न!!

स्पर्धेमध्ये 280 स्पर्धकांचा सहभाग!! मुले आणि मुली यांच्या जलतरणाच्या 130 इव्हेंट चुरशीने पडल्या पार!!

सावली सोशल सर्कल आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक स्पर्धा सहा व सात जुलै 2024 रोजी राजर्षी शाहू जलतरण तलाव, भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथे पार पडल्या.

या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 280 स्पर्धकांनी भाग घेतला. मुले आणि मुली यांच्या एकंदर 130 इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा अत्यंत चुरशीने पार पडली. पुणे मुंबई सातारा सांगली बेळगाव जळगाव नाशिक औरंगाबाद येथून प्रामुख्याने स्पर्धक आले होते.

स्पर्धांना महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना आणि कोल्हापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना यांनी मान्यता दिलेली होती स्पर्धेच्या आयोजनामध्ये श्री अजय पाठक यांनी मध्यवर्ती भूमिका पार पाडली.

दिनांक सहा जुलै रोजी संघटनेचे अध्यक्ष माननीय आनंदराव माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर समारोपाला सावलीचे विश्वस्त किशोर देशपांडे, ॲड. राजन देशपांडे, प्रकाशभाई मेहता, जयंत बनछोडे तसेच सावलीतील अनेक सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

या स्पर्धांच्या आयोजनामध्ये सौरभ शेवाळे, कुणाल सरावणे, ऋषिकेश देशपांडे, शिवानंद पुयम,सागर ओतारी, चेतन वाघ, संग्राम कांबळे, तातू पूयम यांनी मेहनत घेतली.
स्वातंत्र्यवीरांच्या मार्सेलिस उडीच्या निमित्ताने हा चषक आयोजित करण्यात येत असल्याने सर्व स्पर्धक शालेय मुलांना स्वातंत्र्यवीरांच्या जीवनाविषयी अधिक माहिती देण्याकरता स्पर्धा फडणीस लिखित एक पुस्तिकाही भेट देण्यात आली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.