आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे परिसरात बटाटा लागवड घटली!!

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे परिसरात बटाटा लागवड घटली!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्वेला असलेले बटाट्याचे आगर म्हणून ओळख असलेले शिरदाळे गाव यंदा मात्र बटाटा पिकाला कंटाळलेले असल्याचे पाहायला मिळत आहे. भरमसाठ भांडवल,कमी उत्पन्न,पावसाचे कमी जास्त प्रमाण या सगळ्या गोष्टींमुळे एकेकाळी शेकडो हेक्टर बटाटा शेती असणारे शेतकरी आता मात्र इतर नगदी पिकांकडे,कडधान्यांकडे वळलेली पाहायला मिळत आहेत.

शिरदाळे परिसरातील मोठे शेतकरी अशी ओळख असलेले बाबाजी चौधरी,निवृत्ती मिंडे,सुरेश तांबे,केरभाऊ तांबे,राघू रणपिसे,संभाजी सरडे,बाळासाहेब तांबे,कांताराम तांबे अशा शेतकऱ्यांनी यंदा खूपच कमी म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत अर्धीच लागवड केली आहे. शिवाय बटाटा बेण्याला गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्तीचा भाव असल्याने शेतकऱ्यांनी यंदा या पिकाकडे पाठ फिरवल्याने चित्र आहे. २७०० ते ३५०० रु. प्रति क्विंटल खरेदी करून त्यात तेवढे उत्पन्न निघण्याची शास्वती नसल्याने शेतकरी वर्ग कंटाळला असल्याचे मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.त्याबदल्यात सोयाबीन,वाटाणा,मका,मूग,उडीद अशी पिके शेतकऱ्यांनी केली आहे. शिरदाळे परिसरातील शेती म्हणजे निव्वळ जुगार असल्याचे यंदा प्रथमच शिरदाळे येथे बटाटा शेतीचा प्रयोग करणारे आणि शिरदाळे शेतीचा चांगला अभ्यास असणारे शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील यांनी सांगितले. त्यांनी देखील या परिसरात १५ क्विंटलाची लागवड केली असून प्रथमच हा प्रयोग त्यांनी या ठिकाणी केला आहे.

शिरदाळे येथील शेती म्हणजे कष्ट जास्त आणि उत्पन्न कमी असा प्रकार आहे. नुकतेच आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देऊन काहीतरी औद्योगिक प्रकल्प,MIDC किंव्हा इतर उत्पनाचे साधन असणारा प्रकल्प आमच्या गावात व्हावा या आशयाचे निवेदन दिले आहे. साहेब याची दखल घेऊन नक्कीच आमचा विचार करतील असा आम्हाला विश्वास आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार तर मिळेलच शिवाय गावात देखील सुबत्ता येईल असे मा.उपसरपंच श्री.मयुर संभाजी सरडे यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.