आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शालेय अभ्यासात योगाचा समावेश असावा – डॉ.राजाराम हुलवान

शालेय अभ्यासात योगाचा समावेश असावा – डॉ राजाराम हुलवान

आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र आयोजित रायगड जिल्हा परिषद शाळा सायमन कॉलनी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

माणुसकी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांच्या संकल्पनेतून शाळेतील मुलांना आरोग्य चांगले मिळावे या उद्देशाने शाळेत योगाचा क्लास सुरू करून योग हे मुलांपासूनच शिकविले पाहिजे आणि हा योग दिवस रोज चालवा ह्या हेतूने याची सुरुवात प्रत्येक शाळांनी करावी या प्रेरणेने माणुसकी आरोग्य विभाग सदस्य डॉ.राकेश सिंग यांनी आज शाळेतील मुलांना सूर्य नमस्कार व इतर योगासने करून दाखवत त्यांच्याकडून करवून घेतली, याचा आपल्या भविष्यात किती महत्व आहे याची जाणीव करून दिली.

उत्तम आरोग्य कसे टिकवता येईल या बद्दल मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापिका श्रीम. पवार यांनी माणुसकी प्रतिष्ठानचे आभार मानले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.