आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी) येथे वृक्षारोपण संपन्न!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी) येथे वृक्षारोपण संपन्न!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी ) येथे शालेय व्यवस्थापन समिती गवारीमळा व समस्थ ग्रामस्थ गवारीमळा यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.यात विविध रंगाची फुलझाडे,शोभेची झाडे ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते लावण्यात आली.अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.माधुरी गवारी,उपाध्यक्ष महेंद्र गवारी, सदस्य सचिन गवारी, संदीप गवारी, सुनील गवारी, निर्मला गवारी,शाळेच्या मुख्याध्यापक सीमा काळे मॅडम, उपशिक्षक राहुल पाटील, महिलावर्ग तसेच गावकरी मोठ्या संख्येने शाळेमध्ये उपस्थित होते. अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा या ठिकाणी पार पडला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.