आरोग्य व शिक्षणसामाजिक

नाते कलेचे त्या रक्ताशी!!अष्टपैलू कलावंत श्री.बबनराव केरबा भोसले घोगरगावकर

 

नाते कलेचे त्या रक्ताशी!!

अष्टपैलू कलावंत श्री.बबनराव केरबा भोसले घोगरगावकर

या लेखमालेचे आजचे आकर्षण तमाशाकला ज्या कलेतून बाहेर पडते, सरदार, पार्टी काम, हार्मोनियम,शाहीरी, गायक असे अष्टपैलू कलावंत म्हणजे बबनराव केरबा भोसले ,घोगरगावकर ता.श्रीगोंदा जि.अ. नगर हे होय.त्यांच्या आईचे नाव भिमाबाई असून त्यांना एकच मूलगा आहे.वयाच्या नवव्या वर्षापासून कलेचा छंद आपण तमाशा कलाकार होवु ही मनात जिद्द धरून ,कला अवगत केली. “देवाची करणी नारळात पाणी”अगदी तसच झालं…….
अंगात कला अवगत झाल्याने त्यांनी छबुबाई नगरकर, हरिभाऊ अनवीकर ,दत्तोबा तांबे शिरोलीकर, कै.दगडुभाऊ पठारे हमरापूरकर, आनंद लोकनाट्य जळगावकर इ.महान नावाजलेल्या फडात काम करुन एक नंबर चे नाव गाजवले. रसिक त्यांच्या कामाची वाहवा करतात, शबासकीची थाप पाठीवर देतात ,हाच ते पुरस्कार मानतात!!

भोसले यांनी हि झुंज सरजेरावांची (शिवप्रताप), गाढवाचं लग्न, मुंबईची केळेवाली, रक्तात रंगली पहिली रात्र,कोर्टादारी फूटला चूडा इ वगनाट्यात मेन भुमिका करुन, आपल्या अभिनयाने, पहाडी आवाजाने बोलण्याच्या ढबीने आणि शब्द फेकीने, रसिकांच्या ओठांवर आपले नाव ठेवले. शिवाय भोसले यांनी लेखक मुरली शिंदे बोरगांवकर. कै.निवृत्तीबुवा कुरणकर, शब्बीर भाई मनीयार शहाकर,सुलोचना नलवडे,उमा महाजन,धोंडूनाथ महाले,बळवंत धुमाळ, पाथ्रीकर, बाबूराव महाजन, सुधाकर सीमा पोटे,प्रभाताई वाईकर,कोंडीराम शिंणगारे मामा, दिगंबर पठारे इत्यादी नामवंत,गुणवंत कलावंताबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे.शिवाय २५वर्षाचे कलेचे योगदान आनंद लोकनाट्य तमाशा मंडळाला दिले हे मी त्यांचे मोठे भाग्य समजतात. असे भोसले म्हणाले.शेवटी भोसले म्हणतात की, त्यांच्या कुटुंबात तमाशा तीन पिढ्यांपासून सादरीकरण करण्यात येत आहे.

रसिक पुर्वीसारखा आशिक राहिला नाही ,कारण काळानुसार जग इलेक्ट्रॉनिक उपकरणाने बदलले आहे. त्यामुळे ही जिवंत लोककला लोप पावल्याचा भास निर्माण करित आहे.तमाशाकला जिवंत राहावी म्हणून रसिकांनी तिचा आदर करून,दाद दिली पाहिजे तिची जोपासना केली तर,कला ही अजरामर राहिल असे भोसले म्हणाले.
पूर्वी संत तुकाराम महाराज, या वगनाट्यात कै.निवृत्तीबुवा कुरणकर यांच्या समवेत शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचा योग त्यांना मिळाला हे त्यांचे नशिबच समजतात…
भोसले यांची पत्नी संगीताताई या सूध्दा गायिका,लावणी नृत्यांगना,सवाल जबाब,फारश्यात बोलपट, वगनाट्यात भूमिका आणि रंगबाजीमध्ये तयार आहेत. बबनराव भोसले हे गेली ५१ वर्षे तमाशा रसिकांची सेवा करीत असुन ,आज त्यांचे वय ६०वर्षे आहे.त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा झेंडा उंच उभारला आहे.शिवाय बबन भोसले घोगरगावकर सह संगिता जळगावकर या नावाने ओपन पार्टी सध्या चालू आहे.खरच त्यांनी आपले नाव खान्देश व संपूर्ण महाराष्ट्रात झळकवले यात शंकाच नाही.त्यांच्या हातून रसिकांची, रंगदेवतेची, सेवा घडो त्यांना उदंड आयुष्य मिळो,त्यांचे नाव महाराष्ट्रात झळकत राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना……
लेखक
शाहीर खंदारे
ता.नेवासा
मो.८६०५५५८४३२

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.