आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

वाढत्या तापमानामुळे रूग्णसंख्येत वाढ..लहान मुलांची विषेश काळजी घ्यावी – डॉ.रोहिनी भोर प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे

वाढत्या तापमानामुळे रूग्णसंख्येत वाढ..लहान मुलांची विषेश काळजी घ्यावी – डॉ.रोहिनी भोर प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे

प्रतिनिधी-समीर गोरडे

उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे उष्माघात,निर्जलीकरणाची भीती वाढली आहे.लहान मुले,गर्भवती माता,ज्येष्ठ नागरीक,महिला आणि स्थूल नागरिक यांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

लहान मुलांची घ्या काळजी..
लहान मुलांना उष्माघाताचा धोका अधिक असतो.उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुले घराबाहेर उन्हात खूप वेळ खेळत असतात.अनेक मुले विविध प्रकारच्या शिबिरांना जातात. तिथेही उन्हात अनेक खेळांमध्ये सहभागी होतात.त्यामुळे त्यांना धोका अधिक असतो.मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे ओळखणे कठीण ठरू शकते. मुले चिडचिड करत असतील,थकवा जाणवत असेल किंवा डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणे दिसत असतील किंवा अचानक बेशुद्ध पडली, तर तो उष्माघात आहे, असे समजावे.

मुलांच्या अंगाला स्पर्श केल्यावर, त्यांची त्वचा कोरडी आणि गरम वाटू शकते.मुले निस्तेज दिसू लागतात. अर्थात, काही वेळा ही लक्षणे दिसत नाहीत.उष्माघाताची लक्षणे दिसल्यास मुलांना गारव्याच्या ठिकाणी हलवावे. अंगावरचे जास्तीचे कपडे काढून टाकावे. बर्फाचे पॅक आणि ओलसर कापडाने शरीर पुसून घ्यावे. पाणी, सरबत आणि लिंबू पाणी यांसारख्या घरगुती द्रवपदार्थांद्वारे भरपूर पाणी मिळेल याची खात्री करावी.

शरीरातले पाणी कमी होऊ न देणे,भर दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे,उन्हाळ्यासाठी अनुकूल ठरतील असे कपडे वापरा,बाहेर पडताना टोपी, गॉगलचा वापर करा असे डॉ.श्रद्धा पाटील यांनी सांगितले.

उष्माघाताची थोडी जरी लक्षणे दिसली तरी तत्काळ त्याकडे लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक आहे रूग्णाला थंड असलेल्या ठिकाणी हलवून भरपूर पाणी द्यावे.तसेच लहान मुलांनी आईसक्रीम तसेच थंड शितपेय पिणे टाळावे- डॉ.रोहिणी भोर प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे उपचार करताना डॉ.रोहिणी भोर व कर्मचारी

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.