आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे शंभू महादेवाची कावड नाचवत चैत्र यात्रेची सांगता!!

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे शंभू महादेवाची कावड नाचवत चैत्र यात्रेची सांगता!!

शिरदाळे गाव आंबेगाव तालुक्यातील छोटंसं डोंगरावर वसलेलं गाव!! पण या आधुनिक युगात देखील पारंपरिक सण,उत्सव येथे अगदी नित्यनियमाने आणि आनंदाने केले जातात. त्यातीलच एक उत्सव म्हणजे शिखर शिंगणापूर येथे भरणारी चैत्र यात्रा या यात्रेला शिरदाळे येथून शेकडो वर्षापासून सुरू असलेली परंपरा आजही जपत दर यात्रेला भाविक ही महादेवाची कावड घेऊन जात असतात.पंधरा दिवसांपूर्वी या यात्रेला शिरदाळे येथून सालाबादप्रमाणे महादेवाची कावड जात असते.

त्यानंतर चैत्र महिन्याच्या त्रयोदशीला ही कावड गावातील सर्व महादेव मंदिरांना प्रदक्षिणा घालून मिरवणूक काढली जाते.आज देखील हा सोहळा सर्वांनी एकत्र येत मोठ्या आनंदात आणि पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात संपन्न केला. यावेळी तरुण वर्गाने खास करून यात सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर गावच्या मुख्य चौकात सर्वांनी नाचण्याचा आनंद घेत कावड नाचवली. यावेळी मोठ्या संख्येने महिला,पुरुष,तरुण तसेच लहान मुलं उपस्थित होती.


सकाळी शेतातील महादेव मंदिरात अभिषेक करून सायंकाळी आरती करून ही कावड गावाकडे पुन्हा मार्गस्थ होत असते. आंबील आणि घुंगऱ्यांचा नैवद्य यावेळी घरोघरी केला जातो. तर तरुण सहकाऱ्यांनी गुलाल पाणी खेळत मनमुराद आनंद लुटला.

यावेळी गावातील रणपिसे,सरडे,तांबे,मिंडे ,चौधरी मंडळींनी यात उस्फुर्त प्रतिसाद घेत या मिरवणुकीची शोभा वाढवली. अशी माहिती मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी दिली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.