आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिक्षक पतसंस्थेची वार्षिकसभा खेळी मेळीत पडली पार!!

शिक्षक पतसंस्थेची वार्षिकसभा खेळी मेळीत पडली पार!!

निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथे आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्थेची ४५ वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरुण गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी पतसंस्थेचे सचिव प्रकाश तापकीर यांनी अहवाल वाचन करून सभासदांच्या प्रश्नांचे निरसन केले.त्यांना सहसचिव तानाजी रोकडे यांनी सहकार्य केले.

यावेळी सभासंदाना संस्थेच्या वतीने कोणीतीच अडचण येणार नाही. याची काळजी घेतली जाते.आपली संस्था तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था असून नेहमीच सभासदांच्या हिताचा विचार केला जातो.दरवर्षी संस्थेला ” ऑडिट वर्ग-अ ” मिळत आहे.असे अध्यक्ष प्रा.अरूण गोरडे यांनी सांगितले.

यावेळी संस्थेच्या वतीने विविध विद्यालयातील सेवा निवृत होणार्या शिक्षक सुभासदांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य अशोक वळसे,कांताराम टाव्हरे,सुनिल वळसे,अविनाश ठाकूर,प्रकाश सुतार व संस्थेचे सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार संस्थेचे उपाध्याक्ष प्रकाश चव्हाण यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.