आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

अखिल भारतीय 13 व्या सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य महोत्सवात यवतमाळच्या नेहा शर्माचा प्रथम क्रमांक!!

अखिल भारतीय 13 व्या सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य महोत्सवात यवतमाळच्या नेहा शर्माचा प्रथम क्रमांक!!

नागपूर – अखिल नटराजम अंतर संस्कृत संघ, नागपूर यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय 13व्या सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धा आणि महोत्सवात “नृत्य संस्कृती” ही स्पर्धा नागपुर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यात स्पर्धकांनी नृत्यातील वेगवगेल्या प्रकराचे सादरीकरण केले.

यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून तसेच भारतातील विविध नृत्य कलाकरानी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत “सुपर मॉम” या प्रकारात यवतमाळच्या ” नेहा विनोद शर्मा” यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

नेहा शर्मा या नृत्यांगण डांस अकादमी, यवतमाळ येथे विजय बांडे यांचाकडे नृत्य शिक्षण घेत आहेत.

अनेक स्पर्धानाच्या माध्यमातून त्या त्यांची कला सदर करता असतात.त्यांना या प्रवासात त्यांचे पती विनोद शर्मा, मुली तसेच पूर्ण परिवाराची नेहमी साथ लाभत आहे. तसेच यावेळी मैत्रीण राखी कुंडलवाल यांनी सहकार्य केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.