गावडेवाडीच्या सप्ताहाची सांगता दहीहंडी फोडून…
गावडेवाडीच्या सप्ताहाची सांगता दहीहंडी फोडून..
प्रतिनिधी -समीर गोरडे
आदर्श ग्राम गावडेवाडी ता आंबेगाव येथील पांडुरंग मंदिरासमोर असलेल्या छत्रपती शिवाजीराजे चौकात बुधवार (ता. १७ ते बुधवार (ता . २४ )असा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला या सप्ताहाची सांगता ह . भ प मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी व ह भ प दीनानाथ महाराज शिंदे गावडेवाडी यांच्या हस्ते दहीहंडी फोडून करण्यात आली
या सप्ताहात स्थानिक ह भ प महिला व हभपपुरुष भाविकांची प्रवचने संपन्न झाली.
या सप्ताहात ह भ प मधुकर महाराज गायकवाड (आदर्श ग्राम गावडेवाडी )यांचे रामजन्माचे कीर्तन संपन्न झाले तसेच या सप्ताहात वासुदेव महाराज आर्वीकर ( धुळे )ह भ प सिद्दीताई विनायक गावडे (गावडेवाडी ) ह भ प दीनानाथ महाराज शिंदे (गावडेवाडी )ह भ प संतोष महाराज बढेकर (धामणी ) ह भ प सुरेखाताई शिंदे (कळंब )ह भ प अनिकेत महाराज बांगर तसेच हनुमान जन्माचे हभप धोंडीभाऊ महाराज शिंदे (अवसरी खुर्द ) यांचे कीर्तन संपन्न झाले तसेच कविराज महाराज झावरे यांची वारकरी सांप्रदायिक कीर्तन न संपन्न झाली या सप्ताहाची सांगता निलेश महाराज कोरडे (राजगुरुनगर, खेड )यांच्या काल्याच्याकीर्तनाने झाली.
या सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी च्या पारायणाचे व्यासपीठ नेतृत्व ह भ प अनाजी महादेव शेळके यांनी केले ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला महिला व पुरुषांची संख्या लक्षणीय होती . होते या सप्ताहाचे संयोजन ह भ प दीनानाथ महाराज शिंदे व ह भ प नामदेव महाराज पाटील गावडे व माजी सरपंच संतोष गावडे सरपंच विजय गावडे व समस्त ग्रामस्थ गावडेवाडी यांनी केले तसेच या सप्ताहासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन माऊली गावडे संचालक मच्छिंद्र गावडे माजी उपसरपंच किरण गावडे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शंकर गावडे विनायक संतोष गावडेयांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच युवक व बचत गट यांनी दररोजच्या अन्नप्रसादाच्या वाटपाचे नियोजन केले .आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मृदुंगाची व गायनाची साथ केली.
आदर्श ग्राम गावडेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहची सांगता ह भ प मधुकर महाराज गायकवाड व दीनानाथ महाराज शिंदे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून सांगता..