खरीप हंगामात सोयाबीन उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया करण्याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन!!

खरीप हंगामात सोयाबीन उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया करण्याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन!!
प्रतिनिधी – समीर गोरडे
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या खरीप हंगाम पेरणीसाठी सोयाबीन बियाण्याची पेरणीपूर्वक उगणक्षमता तपासणी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना घरच्या घरी उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांनी केले आहे.
सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासणी करताना घरचे बियाणे चाळणी करून त्यामध्ये काडीकचरा, खराब दाणे, खडे साफ करून घ्यावे. गोणपाट ओले करून घ्यावे व सोयाबीनचे १०० दाणे घेऊन एका ओळीत १० याप्रमाणे १० ओळी मांडाव्यात. त्यानुसार गोणपाटात मांडणी केलेले दाणे चार-पाच दिवस ओले राखण्याकरता त्यावर दररोज हलके पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर शंभर दाण्यांपैकी किती बियांना मोड आले ते पहावे. गोणपाट ऐवजी आपण कागदाचाही वापर करु शकतो.
कागदाच्या एका कागदास चार घडी पाडून तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा प्रत्येकी १० बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून कागदाच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी अशा रीतीने १०० बियांच्या १० गुंडाळ्या तयार कराव्या नंतर त्या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळू उघडून पाहून त्यात बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. आपणास जर ७० बियांना अंकुर फुटलेले दिसून आले तर बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के आहे असे समजावे. त्यानुसार किमान ७० टक्के उगणक्षमता असलेले हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे.
कृषि सहाय्यक श्रीमती नमिता राशिनकर यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी सोयाबीन उगवणक्षमता चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बुरशीनाशक थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे त्यानंतर रायझोबियम २५० ग्रॅम १० किलो बियाण्यास बीज्रक्रिया करावी.
अशा पद्धतीने मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ साहेब व कृषि पर्यवेक्षक बिराजदारसाहेब यांच्या सूचनेनुसार लौकी भागातील शेतकऱ्यांना अवाहान करण्यात येत आहे.तसेच कृषि विभागाच्या विविध योजना राबविण्यात यावेत असे आह्वान कृषि सहाय्यक नमिता राशिनकर यांनी केले.