मांदळेवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन.


मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील श्री हनुमान मंदिराच्या वर्ष ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री अखंड हरीनाम सप्ताहा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त गुरुवार (दि :२४ एप्रिल) ते गुरूवार (दि :१ मे) पर्यंत कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.सप्ताह काळात दररोज फाटे ४ ते ६ काकडा आरती, अखंड विना वादन,सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२ गाथाभजन,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व ७ ते ९ हरिकीर्तन,रात्री ९ ते १० महाप्रसाद व नंतर हरिजागर हे कार्यक्रम आयोजित केले आहे. गुरुवार (दि.२४) योगेश महाराज गायकवाड ( निफाड), शुक्रवार (दि.२५) गणेश महाराज कार्ले( पुणे), शनिवार (दि.२६) पोपट महाराज पाटील ( कासारखेड-जळगाव ), रविवार (दि. २७) महंत प्रमोद महाराज जगताप ( बारामती), सोमवार (दि.२८) ज्ञानेश्वर महाराज कदम-छोटे माऊली( आळंदी), मंगळवार (दि.२९) कबीर महाराज आतार( खेड शिवापूर ), बुधवार (दि.३०) सुनिल महाराज झांबरे (बिड) तसेच बुधवार (दि.३०) रोजी ग्रंथराराज ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा व प्रदक्षिणा सायंकाळी साडेचार ते सात वाजता होणार आहे. व गुरुवार (दि :०१ मे ) रोजी सकाळी साडे आठ ते साडेदहा वाजता सुनिल महाराज झांबरे ( बीड) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.दररोज हरिकीर्तन संपल्यानंतर रात्री ९ वाजता सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.