क्राईम स्टोरीताज्या घडामोडीसामाजिक

पारगाव (शिंगवे) येथील पुलांच्या कठड्याचे लोखंडी पाईप गेले चोरीला!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) परिसरात मोठ्या प्रमाणात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे.यावेळी चोरट्यांनी चक्क कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तसेच छोट्या पुलांचे संरक्षक कठडे यांना लक्ष्य केले आहे.

या परिसरात घोड, मीना नदीच्या पात्रांवर अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधलेले आहेत. लोकांच्या सोयीसाठी या बंधाऱ्यांना संरक्षण कठडे म्हणून लोखंडी पाईप लावण्यात आले आहेत. यातील बहुतांशी बंधारे हे लोकवस्ती पासून दूर असल्याने त्याचा भुरट्या चोरट्यांनी फायदा घेतला आहे. गुरुवारी (दि.१७) चोरट्यांनी वाडा वस्ती येथे लोखंडे व माळी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर छोट्या पुलाचे संरक्षण कठडे व कठड्यांचे लोखंडी पाईप पळवून नेले.मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे व सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात या घटनेची खबर दिली असुन पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार अजित मडके, दिव्या नवले यांनी शुक्रवारी (दि. १८) सकाळी घटनास्थळांची पाहणी केली.

यापूर्वीही देखील पारगाव परिसरातील खारओढा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे चोरट्यांनी लंपास केले आहेत.अनेक शेतकऱ्यांचे वीजपंप,केबलदेखील चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.आता छोट्या पुलांचे तसेच बंधाऱ्यांच्या संरक्षक कठड्याचे लोखंडी पाईप चोरटे पळवत आहेत. पारगाव पोलिसांनी या भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी केली आहे.

पारगाव ता.आंबेगाव येथे चोरीला गेलेल्या लोखंडी पाईपची पाहणी करताना पारगाव पोलीस ठाण्याची अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.