लोणी- मंचर रस्त्यावरील भोजनदरा येथील रस्त्याच्या कडेच्या विहीरीजवळील झुडपे काढली!!


पंचनामा प्रतिनिधी – लोणी ते मंचर (ता.आंबेगाव) या रस्त्यावर जारकरवाडी येथील भोजणदरा येथे अगदी रस्त्याच्या कडेला विहीर आहे. पण विहिरीच्या कडेला मोठया प्रमाणात झुडपे वाढलेली आहेत विशेष म्हणजे नेमके याच ठिकाणी वळण असल्याने समोरून येणारी लहान,मोठी वाहने वाहनचालकांना दिसत नव्हती. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता होती. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालकांनी जारकरवाडी ग्रामपंचायतीला कळविले.ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करेल याची वाट न पाहता सरपंच प्रतिक्षा बढेकर,उपसरपंच सुवर्णा भांड,उपसरपंच सचिन टाव्हरे,मा.उपसरपंच कौशल्या भोजणे व ग्रामपंचायत सदस्यांनी तातडीने रस्त्याला अडथळा ठरणारी झुडपे जेसीबीच्या साह्याने काढून टाकली व रस्ता मोकळा केला. पण या ठिकाणी असणारी विहिरी अजूनही धोकादायक असल्याने विहिरीच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यामातून किंवा ग्रामपंचायतीच्या शासनाच्या फंडातून सरंक्षक भिती बांधू असे उपसरपंच सचिन टाव्हरे यांनी सांगितले.मूळात हे काम सार्वजनिक विभागाचे आहे.पण जारकरवाडी ग्रामपंचायतीने स्वःत पुढाकार घेऊन ही झुडपे काढली त्यामुळे वाहनचालकांनी व ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहेत.

लोणी मंचर रस्त्यावर जारकरवाडी येथील भोजनदरा येथे विहिरीच्या बाजूची झुडपे ग्रामपंचायत जारकरवाडी यांच्या माध्यमातून काढण्यात आली.