ताज्या घडामोडी

धामणी (ता.आंबेगाव) येथील काळूबाई, तुळजाभवानी माता मंदिरात चोरी!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील काळूबाई, तुळजाभवानी माता मंदिरात चोरी!!

धामणी (ता.आंबेगाव ) या गावच्या हद्दीत हिवरकरमळा येथील काळुबाई माता व तुळजाभवानी माता मंदिरात पाच दिवसापूर्वी चोरट्यांनी काळुबाई माता व तुळजाभवानी माता मंदिरांचे सेप्टी दरवाजांचे कडीकोयंडे तोडुन मंदिरातील काळुबाई, तुळजाभवानी मंदिरातून वीस हजार रुपये किमतीचे काळुबाई देवीचे पाच ग्रॉम वजनाचे सोन्याच्या दोन वाट्या व चार मोठे मनी असलेले मनी मंगळसुत्र, सोळा हजार रूपये किमतीचे तुळजाभवानी देवीचे चार ग्रॅम वजनाचे चार सोन्याचे मनी असलेली काळ्या मन्यांची पोथ,आठ हजार रुपये किमतीचे काळुबाईचे लहान मुर्तीचे दोन ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे मनी असलेली काळ्या मन्यांची पोथ, चार हजार रूपये किमतीच्या चारशे ग्रॅम वजनाच्या काळुबाई माता मंदिरामधील चांदीच्या पादुका, चार हजार रुपये किमतीच्या चारशे ग्रॅम वजनाच्या तुळजाभवानी माता मंदिरामधील चांदीच्या पादुका, चार हजार रुपये रोख रक्कम दोन्ही मंदिराचे दान पेटयांमधील त्यात वेगवेगळ्या चलणी नोटा व नाणी असे मिळून ५६,०००/ रुपयांची चोरी चोरट्यांनी केल्याचे पारगाव पोलीसांनी सांगितले.

या बाबत चोरी झाल्याची तक्रार शंकर सखाराम हिवरकर यांनी केली आहे.त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञान चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद घोडके व ठाणे अंमलदार नरेंद्र गोराणे हे करीत आहे.


पुन्हा एकदा आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात भूरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू झाला.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या चोरीकडे गांभीर्याने पाहून रात्रीची गस्त घालावी अशी मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.