जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर (ता.आंबेगाव) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न!!


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर (ता.आंबेगाव) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न!!
सन २०२४/२५ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन व NSSE परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा तसेच इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर येथे करण्यात आले होते.
यामध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी तनुजा उत्तम आदक – मंथन परीक्षेत ३०० पैकी २९६ गुण मिळवून राज्यात सातवी तर NSSE परीक्षेत २०० पैकी १८२ गुण मिळवून राज्यात दहावी,ओवी योगेश आदक – मंथन परीक्षेत ३००पैकी २७४ गुण मिळवून जिल्ह्यात आठवी तर NSSE परीक्षेत २०० पैकी १८० गुण मिळवून राज्यात अकरावी आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या दोन विद्यार्थिनींना श्री.निलेश बाळासाहेब साबळे यांचेकडून प्रत्येकी २१००/- रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
यावेळी मंथन परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या इयत्ता तिसरीतील ईश्वरी रविंद्र गुळवे, तोसिफ इब्राम मुजावर,सार्थक योगेश वाळुंज तर इयत्ता सहावीतील तेजस्विनी विष्णू मात्रे,गायत्री सचिन आदक, विघ्नेश विजय मानमोडे या विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला.यावेळी इयत्ता ७ वीतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मान्यवरच्या हस्ते मार्गदर्शक शिक्षक सौ.सुरेखा किसन वाळुंज,श्री गणेश बाळशिराम गावडे,सौ.वैशाली वसंत नाटे,शामल फकिरा पोखरकर व शाळेचे मुख्याध्यापक श्री.भगवंत मारुती टाव्हरे सर यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी मा.उपसरपंच रविद्र गुळवे,अण्णा पोखरकर मा.चेअरमन पोपटराव राजगुडे,दत्ता पोखरकर,दता आदक,जनसेवक अवदुत राजगुडे, गोरक्ष आदक,रमेश रोकडे,रुपाली आदक,लंके ताई व इतर मान्यवर पालक व ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.सर्वाचे अभिनंदन आभार अध्यक्ष योगेश शांताराम आदक (शालेय शिक्षण समिती वडगावपीर) यांच्या वतीने करण्यात आले .




