आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

भय इथले संपत नाही !!निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे बिबट्याने केली कालवडीची शिकार!!

पंचनामा प्रतिनिधी निरगुडसर – आंबेगाव तालुक्यातील बिबट्याचे पाळीव प्राण्यावर होणारे हल्ले काही कमी होताना दिसत नाहीत.निरगुडसर येथील विकासनगर (डफळी) येथे बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या कालवडीची शिकार केल्याची घटना बुधवार दि.३० रोजी पहाटे अडीच वाजताचे सुमारास घडली आहे.

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील निरगुडसर – मेंगडेवाडी रस्त्यावर असलेल्या विकासनगर येथील शेतकरी विकास मारुती मेंगडे यांच्या मुक्त गोठ्यात सहा गाई, दोन शेळ्या, एक बैल व अडीच महिन्याची कालवड आहे.बिबट्याने बुधवारी पहाटे अंदाजे अडीच वाजता गोठ्यात प्रवेश करत दोरीने बांधलेल्या कालवडीला ठार केले नंतर तिला ओढत नेण्याचा प्रयत्न केला.मात्र कालवड दोरीने बांधलेली असल्याने ती बाहेर नेता आली नाही.विशेष म्हणजे बिबट्याने जागेवर तिचा फडशा पाडला.

सकाळी शेतकरी विकास मेंगडे हे उठले असता त्यांना गोठ्यात कालवड मृत अवस्थेत दिसली.याबाबत त्यांनी वनविभागाचे अधिकारी यांना कळविले असता वनरक्षक अश्विनी डफळ, वनमजूर दशरथ मेंगडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

या परिसरात दडन क्षेत्र अधिक आहे. शिवाय पिण्यासाठी बारमाही पाणी उपलब्ध आहे. साहजिकच या परिसरात बिबट्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी विकास मेंगडे यांच्या गोठ्यातील बारा कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकरी विकास मेंगडे, कैलास सुडके, डॉ. विलास मेंगडे, मंगेश सुडके, हरीश सुडके, विशाल मेंगडे, राजू वळसे, शाहरुख इनामदार, प्रसाद मेंगडे यांनी केली आहे.

निरगुडसर येथील विकासनगर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी वनरक्षक अश्विनी डफळ यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.