आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

अवसरी बुद्रुक ते कल्याण एस.टी.बस सेवा झाली आहे अचानक बंद!!

पंचनामा मंचर प्रतिनिधी- अवसरी बुद्रूक (ता.आंबेगाव ) ते कल्याण हि एसटी बस गेली ३६ वर्ष सतत फायद्यात चालणारी एसटी बस मुरबाड आगाराने एक महिन्यापासून अचानक बंद केल्याने कल्याणला ये- जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असल्याने मुरबाड आगर प्रमुखांनी तातडीने पुन्हा एसटी बस चालू करावी अशी मागणी अवसरी बुद्रुक गावच्या सरपंच सारिका हिंगे यांनी केले असून याबाबत अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्रव्यवहार केला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून सकाळी साडेसहा वाजता कल्याणला जाणारी अवसरी बुद्रूक कल्याण एसटी बस १६/४/१९९१ रोजी मुरबाड डेपोचे तात्कालीन चालक भाऊसाहेब फुलसुंदर यांच्या पुढाकाराने चालू झाली.अवसरी बुद्रूक-कल्याण एसटी बसचा लाभ अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, मेंगडेवाडी, वळसेमळा येथील प्रवाशांना होत होता.वरील गावातील बहुतांशी नोकरदार बदलापूर कल्याण मुरबाड आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत.तसेच वरील गावातील विद्यार्थी, नारायणगाव, आळेफाटा,जुन्नर,ओतूर संगमनेर आदी इंजिनिअरिंग कॉलेजला ये-जा करत असतात अवसरी बुद्रूक ते कल्याण एसटी बस अवसरी बुद्रूक वरून सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी सुटून साडेअकरा मिनिटांनी कल्याणला पोहोचत असल्याने मंचर नारायणगाव आळेफाटा, ओतूर येथील गावातील व्यापाऱ्यांना या एसटी बसचा चांगला फायदा होत होता.अवसरी कल्याण एसटी बस छत्तीस वर्षांपूर्वी चालू झाली त्यानंतर सतत फायद्यात चालणारी एसटी बस बदलापूर डेपो ने कोणतेही कारण नसताना अचानक बंद केल्याने पूर्व भागातील प्रवाशांना आता मंचर किंवा आळेफाटा येथे जाऊन कल्याणला जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशासह कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याने प्रवासी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. चार दिवसापूर्वी अवसरी खुर्द अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र व्यवहार करून मुरबाड डेपोने बंद केलेली कल्याण अवसरी बुद्रुक एसटी बस पूर्ववत चालू करण्याची मागणी केली आहे.

अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतने कल्याण ते अवसरी बुद्रुक एसटी बसचा चालक, वाहक यांना राहण्याची, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. सतत ३६ वर्ष फायद्यात चालणारी अवसरी बुद्रूक कल्याण एसटी बस बंद केल्याने प्रवाशांना नाराजी व्यक्त केली असून ही बस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.


Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.