आरोग्य व शिक्षणसामाजिक

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात विद्यार्थीचा स्वागतोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न !!

पंचनामा शहापूर प्रतिनिधी – विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शाखा मोहिली – अघई, ता शहापूर, जि. ठाणे येथे आत्मा मालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने, संत परिवाराच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस समस्त विश्वस्त मंडळ , स्थानिक व्यवस्थापन समिती कार्याध्यक्ष व स्थानिक सदस्य मंडळ यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस स्वागतोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संकुलाच्या शैक्षणिक व्यवस्थापिका श्रीमती श्रीलता नायर मँडम, एच् आर् विभाग व नामांकित योजनेचे समन्वयक राहुल जाधव सर, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अँण्ड ज्यूनियर काँलेजच्या प्राचार्या श्रीमती पौर्णिमा उपासनी मँडम, आत्मा मालिक इंटरनँशनल स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात सर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयिक सोनी पाशा मँडम व वसतिगृह व्यवस्थापक बिकाश राँय सर आदी मान्यवर उपस्थित होते.
 कार्यक्रमाची सुरुवात आत्मप्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी स्वरांजली ग्रुपने स्वागत गीत गाऊन सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.
यावेळी शैक्षणिक व्यवस्थापिका श्रीलता नायर मॅडम व प्राचार्या पौर्णिमा उपासनी मॅडम यांचा सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व आत्मरूप प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ साठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचा परिचय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. शैक्षणिक व्यवस्थापिका श्रीलता नायर व प्राचार्या पौर्णिमा उपासनी यांच्या हस्ते शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तर शिक्षिकांनी सभागृहात बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना औक्षण करून त्यांंचे स्वागत केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नित्यानंद पाटील सर , सोनी पाशा व रीना भानुशाली मॅडम, जगदीश घनघाव यांनी मनोगते व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळीराम शिंदे व आभारप्रदर्शन संतोष कनकोशे यांनी केले. उपस्थित सर्वांना संकुलच्या वतीने शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी अथक परिश्रम घेतले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.