निगडाळे (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी संपन्न!!


पंचनामा भीमाशंकर प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.

बालसभेच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळकांची वेशभूषा केलेला इयत्ता तिसरीतील विद्यार्थी प्रणव किरण लोहकरे हा होता.शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी लोहकरे,शिक्षक संतोष थोरात,अंगणवाडी मदतनीस लिलाबाई लोहकरे,पोषण आहार स्वयंपाकी योगिता भोमाळे यांसह विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी शाळेत बालसभा संपन्न झाली.बालसभेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त श्रुती भोमाळे,अक्षदा तिटकारे,सिया पवार,अनुजा भोमाळे आदी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे बालपण,शिक्षण,देशकार्य आदी विषयांवर भाषणे केली.इयत्ता तिसरीतील विद्यार्थी प्रणव लोहकरे याने ‘मी लोकमान्य टिळक बोलतोय’ यावर आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आली.

कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी प्रांजल गायकवाड,माही पवार,परेश लोहकरे,देवांश केंगले,स्वरा गायकवाड,संकेत लोहकरे यांनी केले.यावेळी मुख्याध्यापिका शोभा जाधव यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आर्या कुऱ्हाडे आणि आभार स्वरा शेळके हिने मानले.