शिंगवे (पारगाव) येथे नवोगत विद्यार्थ्यांना बिस्किटे,गुलाबाचे फुल देऊन स्वागत!!

पंचनामा शिंगवे (पारगाव) प्रतिनिधी – समीर गोरडे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे (पारगाव) येथे फेटा बांधून व गुलाबाचे फुल देऊन नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.उपक्रमशील शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे शाळेची ओळख निर्माण झाली आहे.अनेक नवनवीन उपक्रम शाळेत राबविले जातात.शाळा चांगली असली की मुले शिकतात,अस काही नाही तर मुले चांगली असली की शाळा कुठेही शिकतात.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे.

गोरगरीब नागरिकांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सरकारकडून सरकारी शाळा उपलब्ध आहेत. मात्र सध्याच्या आधुनिक काळात शिक्षणाच्या खाजगीकरणात मोठी वाढ झाली आहे. स्पर्धेच्या युगात सरकारी शाळा टिकवणे हे आता मोठे आव्हान होत आहे. ग्रामीण भागातील शाळा टिकल्या तरच ग्रामीण भागातील मुले शिकतील असे मत मुख्यापक नवनाथ सिनलकर यांनी व्यक्त केले. नवोगत विद्यार्थ्यांना पहिली वर्गाच्या वर्ग शिक्षिका संगिता शिंदे,जालिंदर पोंदे, धनंजय पवार, राजेंद्र बोंबे,सुषमा कदम, योगिता बुट्टे,स्वाती सोनवणे यांनी गुलाबाचे फुल व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैजनाथ येंथे,उपाध्यक्ष गोरक्षनाथ जगताप आदी ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने हजर होते.




