पारगाव (शिंगवे) येथील तरुणांनी खडतर प्रवास करत केदारनाथ बाबांचे घेतले दर्शन….


पंचनामा प्रतिनिधी -शिंगवे पारगाव समीर गोरडे
उत्तराखंड राज्यामध्ये असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचे मानले जाणारे ज्योतिर्लिंग पारगाव मधील सात तरुण सहकाऱ्यांनी मिळून चारधाम यात्रा पूर्ण केली.
चारधाम मध्ये प्रथमता यमुनोत्री धाम पासून ट्रॅकला सुरुवात केली. यमुनोत्री यमुना नदीचे दर्शन घेण्यासाठी सात किलोमीटर अंतर पाई पार केले. नंतर गंगोत्री धाम गंगा मातेचे दर्शन घेतले.
केदारनाथ बाबाचे दर्शन घेण्यासाठी सोनप्रयाग पासून ते केदारनाथ बाबांचे दर्शन 28 किलोमीटर पहाडांमधून रस्ता काढत अडीअडचणी पार करत जागोजागी दरडी कोसळत होत्या,जसे जसे वरती जात होतो तशी तशी ऑक्सिजन लेवल देखील कमी होत होती, परंतु या तरूणांनी हार न मानता चालत राहिले आणि तब्बल दहा तासांनी केदारनाथ बाबांच्या मंदिरापर्यंत पोहोचून दर्शन घेतले. आणि संपूर्णतः दुखावट दूर झाली, असं म्हणतात की जिवंत पणी स्वर्ग अनुभवायचा असेल तर केदारनाथला किंवा अमरनाथ ला जावे असाच जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव घेतला, पारगाव नगरीचे ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे,गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर,
श्रीकांत लोखंडे,अनिल शेवाळे, कॉन्ट्रॅक्टर ओंकारशेठ ढोबळे,अविनाश ढोबळे,एकनाथ कुटे,अतुल ढोबळे, या तरुणांनी बाबा केदारनाथ, हर हर महादेव,छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गर्जना देत दर्शन घेतले, व प्रत्यक्षात जिवंतपणी स्वर्गाचा आनंद अनुभुवायला मिळाला असल्याचे या वेळी तरूणांनी सांगितले..


