आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

रॉयल रायडर्सच्या मार्च चॅलेंज चे मेडल वितरण संपन्न!!

रॉयल रायडर्सच्या मार्च चॅलेंज चे मेडल वितरण संपन्न!!

निफाड (वार्ताहर) :- शहीद भगतसिंग यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून रॉयल रायडर्स च्या माध्यमातून 3 मार्च ते 30 मार्च 2024 दरम्यान सायकलिंग व्हर्च्युअल चॅलेंज आयोजित करण्यात आले होते. विजेत्या रायडर्स चा मेडल वितरण समारंभ आज लक्ष्मीविजय लॉन्स, नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. 65 वर्षीय आंतरराष्ट्रीय धावपटूश्री तानाजी भोर हे प्रमुख अतिथी होते तर सायकलिस्ट नलिनी कड मॅडम व प्रा सुदाम आथरे सर मंचावर उपस्थित होते.

भगतसिंग यांचे बालपण, जालियनवाला बाग हत्याकांड पासून त्यांनी घेतलेली प्रेरणा, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान, युवकांची उभारलेली संघटना, इंग्लंड च्या असेंब्ली मद्धे केलेला बॉम्बस्फोट ,लाहोर जेलमध्ये भोगलेल्या नरकयातना, सुखदेव राजगुरु यांच्यासोबत झालेली फाशीची शिक्षा, हुसैनीवाला येथील शहिद स्मारक इ बद्दल माहिती उपस्थित रायडर्सला देण्यात आली.

प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सर्व फिनिशर सायकलिस्ट चा मेडल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जयंत बु-हाडे, राजाभाऊ शहाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नलिनी कड मॅडम, सुदाम आथरे सर यांनी मार्गदर्शन केले तर प्रमुख अतिथी श्री तानाजी भोर सर यांनी रनिंग मधील ट्रिक्स व टिप्स समजावून सांगितल्या. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केल्या सहभागाचे विश्लेषण करून व्यायामात सातत्य असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील रायडर्स सह पंजाब, हरियाणा, तामिळनाडू , कर्नाटक येथील सायकलिस्ट 305 सायकलिस्टने यात सहभाग घेतला. सर्व सायकलिस्ट मिळून एक लाख पासष्ट हजार किमी सायकलिंग या चॅलेंज दरम्यान करण्यात आली. रॉयल टेक्निकल टीमने खूप मेहनतीने रिझल्ट बनवताना पारदर्शकता ठेवली. मार्च महिना असूनही सायकलिस्ट ने उत्साहात सायकलिंग केले.

आभार प्रदर्शन राजेंद्र राजोळे यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य सहभागी रायडर्स उपस्थित होते.

नाशिक येथे रॉयल रायडर्सच्या मेडलचे वितरणप्रसंगी उपस्थित मान्यवर व रायडर्स.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.