आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

विजेच्या लपंडावामुळे,बळीराजा त्रस्त!!महावितरणच्या कारभारामुळे नागरीकांना मोठा मनस्ताप!!

विजेच्या लपंडावामुळे,बळीराजा त्रस्त!!महावितरणच्या कारभारामुळे नागरीकांना मोठा मनस्ताप!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

गावडेवाडी,अवसरी परिसरातील सततच्या विजेच्या लपंडवामुळे नागरिक पुरते हैराण झाले असुन ऐन याञेच्या कालावधीतच असे विजेचे लपंडाव चालू असल्याने परिसरातील नागरिकांना तसेच बळीराजाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असुन ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे अवसरी गावडेवाडी परिसरातील नागरिक घामाघूम झाले असुन तसेच विजेच्या लपंडावामुळे शेतीपप बंद असल्याने पाण्याअभावी पिके कोमेजुन जात आहे.

उन्हाळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याने राज्यभरात विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही गरज भागविणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी काही वेळेसाठी भारनियमन केले जाते. हे भारनियमन काही तासांपुरते असते; परंतू अनेक वेळा या परिसरात महावितरणचे अधिकारी भारनियमन नेमके किती आहे; याविषयी देखील निश्चित काही बोलताना दिसत नाहीत. बऱ्याचदा रात्रभर, दिवसभर आणि अनेकदा दोन दोन दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने; परिसरातील नागरिक पुरते वैतागले आहेत.

विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, लहान मुले सगळ्यांनाच उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेच्या समस्येमुळे शेतीमालाला वेळेवर पाणी देणे शक्य होत नसल्याने पिके करपू लागली आहेत. वेजेवर चालू असणारी अनेक उपकरणे, कडबा कुट्टी, पिठाची चक्की, गावच्या नळपाणी पुरवठा योजनेचे पंप आदी गोष्टी ठप्प झाल्याने या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून, हे भारनियमन याञेच्या कालावधीतच केल्याने गावी याञेसाठी मुंबईकर तसेच पुणेकरांना माञ पश्चात्ताप झालेला पहायला मिळत होता याबाबत सरपंच विजय गावडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, संबंधित अधिकारी यांनी देखील वर बोट करून जबाबदारी झटकत असल्याचे बोलले जात आहे.

सदर गावडेवाडी अवसरी हा परिसर बिबट प्रवण क्षेत्र असल्याने या परिसरात राञीच्या वेळी विज महत्वाचा विषय असल्याने विद्युत वितरण कंपनीचे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन राञीच्या वेळी लाईट पुरवावी अशी मागणी केली आहे तसेच काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आधीच दक्षता घ्यावी- सरपंच विजय गावडे

अनेक वेळा विद्युत वितरण कंपनी मार्फत देण्यात येणारी बिले हि ग्राहकांना चुकीचे रिटींग टाकून मिळत असुन ग्राहक संबंधित कार्यालयाकडे गेले असता तेथील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्राहकांना मागे पाठवत असुन त्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असुन याकडे विद्युत वितरण कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे – मनोज तळेकर सामाजिक कार्यकर्त

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.