आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नाते कलेचे त्या रक्ताशी!!सौ.रेखा वसंत चव्हाण कोरेगावकर

अखंड महाराष्ट्रातील तमाशा लोककलेच्या रसिकांनो…..
नाते कलेचे त्या रक्ताशी या लेखमालेचे आजचे आकर्षण ताल,स्वर,लय, अभिनय, आणि अदाकारीने रसिकांना मोहित करणारी तमाशातील सुशिक्षित कलावंत सौ.रेखा वसंत चव्हाण ,कोरेगावकर ता.कर्जत जि.अ.नगर होय.

नृत्यअप्सरा रेखाताईंच्या आईंचे नाव शंकुतलाताई असून ,रेखाताईस १मुलगा व एक १ मुलगी आहे.
सौ.रेखाताईचे शिक्षण बी.ए . झाले असून, त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षापासून कलेचा छंद लागलेला होता.लावणी नृत्याचा चांगलाच बाज अंगात संचारला.तमाशा कलेची आवड लागल्याने मा. चंद्रकांत ढवळपुरीकर,मा.दत्ता महाडिक पुणेकर श्रीम ,विठाबाई नारायणगावकर, श्रीम.मंगला बनसोडे ,करवडीकर इ.नामवंत तमाशा फडात काम करुन आपले नाव महाराष्ट्रातील रसिकांच्या ओठांवर ठेवले आहे. त्यानंतर सौ.रेखा चव्हाण या नावाने ओपन तमाशा फड चालू केला होता.सौ.रेखाताईने यांनी रक्तात न्हाली कु-हाड,या वगनाट्यामध्ये वेडीची भूमिका करून रसिकांची मने जिंकली होती.त्यानंतर असे घराणे नष्ट करा,आई पुन्हा जन्म घेशील का?, मुंबईची केळेवाली,रक्ताचे दान कूंकवाला आणि संत तुकाराम इत्यादी वगनाट्यात काम करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

सौ.रेखाताई यांचे रहाणीमान साधे असून, कलेतील प्रमाणिकपणा ,कला रसिकांची आवड,कलेशी एकनिष्ठपणा,कलावंताच्या सुख दु:खाची जाणीव,कलेवर प्रेम,खरे बोलणे इ.गुण त्यांच्या अंगी आहेत.
त्यामुळे त्यांच्या कलाजीवनाचा विकास होत आहे जीवन सुखाचे बनले आहे..त्या स्टेजवर येताच रसिक शिट्ट्या,टाळ्या आणि जल्लोषात त्यांचे स्वागत करतात,रेखाताई या गायनात,लावणीत,डांन्सर, गणगौवळण,फारश्यात बोलपट, आणि वगनाट्यात भुमिका करण्यातही अष्टपैलू कलावंत आहेत.
सौ.रेखाताईने, राम पोखरकर,लेखक मुरलीधर शिंदे,शेषीताई बारडकर,बापूगीरी,लक्ष्मणगीरी, शेवाळे मामा, खाडे मामा,आणि खुडे मामा अशा नामवंत कलाकारांबरोबर काम केले आहे.

सौ.रेखाताई आणि त्यांचे पती वसंत चव्हाण यांनी आपली मुले शिक्षण ,संस्काराने घडविली असून , मुलगी दुबईला इंजिनिअर असून ठमुलगा पुण्याला टेल्को कंपनीत आहे.
कलेसाठी सतत बाहेर असूनी ,लक्ष कुटुंबाकडे ठेऊन ,तमाशाकलावंताचे घर कसे असावे याचे उत्तम उदाहरण चव्हाण कुटुंबाचे घर आहे.कलेत राहून सतत रडगाणे गाणा-यांनी काही कलावंतानी चव्हाण कुटुंबाचा आदर्श घ्यावा.
कलेच्या जीवावर पोटापुरते कमवुन संसार सुखाने चालवित आहे.

सौ.रेखाताईचे वय ४१वर्षाचे असून त्या २७वर्षे रसिकांची सेवा करीत आहेत.त्या म्हणतात की,फडमालकांनी जातीनीशी लक्ष देऊन जुन्या तमाशाचा बाज दाखवून,समाजप्रबोधन वगनाट्य दाखवली पाहिजे
विनोदसम्राट वसंतराव चव्हाण आणि सौ.रेखा चव्हाण हि दोघे पती पत्नी तन, मन,धन एकत्र करून आपली कला रसिकांच्या पदरात पाडतात.

सौ. रेखाताई म्हणतात की,कलेच्या माध्यमातून मिळालेले नांव आणि रसिकांनी,आमच्या कलेची केलेली वाह व्वा व्वा, दिलेली शाबासकीची थाप हा आमचा मोठा पुरस्कार आहे.
असे मानतात.आयुष्यभर रसिकांची सेवा करू ,पण रसिकांनी अस्सल कलेची किंमत करावी हि अपेक्षा सौ.रेखाताईने व्यक्त केली.

खरचं त्यांच्या हातुन रसिकांची,रंगदेवतेची,देशाची,थोरा मोठ्यांची सेवा घडो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांचे नाव महाराष्ट्रात झळकत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
लेखक
शाहीर खंदारे
ता.नेवासा
मो.८६०५५५८४३२

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.