ताज्या घडामोडीराजकीय

जारकरवाडी(ता.आंबेगाव)विविध कार्यकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सुभाष भोजने यांची बिनविरोध निवड!!

जारकरवाडी(ता.आंबेगाव) विविध कार्यकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सुभाष भोजने यांची बिनविरोध निवड!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सुभाष भोजने यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मावळते उपाध्यक्ष बाळू शंकर लबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावर सुभाष भोजने यांची निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया मंचर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली.

यावेळी संस्थेचे विद्यमान चेअरमन सूर्यकांत लबडे, मा.चेअरमन खंडू आप्पा भोजने, जारकरवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच ॲड.रूपाली भोजने, माजी सरपंच शरद अण्णा भोजने, डी.डी. भोजने, रसिक भोजने,एकनाथ भोजने,आनंदा भोजने, जालिंदर भोजने, रमेश वनवे व सर्व संचालक उपस्थित होते.

राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने तसेच सहकार खात्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून या योजनेचा त्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पंचनामाशी बोलताना त्यांनी सांगितले.

उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुभाष भोजने यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.वाघमारे यांनी काम पाहिले. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव नवनाथ मंचरे यांनी कामकाज पाहिले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.