ताज्या घडामोडीराजकीय

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले; त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधवांच्या समस्या तळमळीने सोडवितात – खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले; त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधवांच्या समस्या तळमळीने सोडवितात
– खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे
~~~~
जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील देवळे येथे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित महिला व पुरुष बांधवांना मार्गदर्शन केले.

या मेळाव्यास शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील, जुन्नरचे मा.आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख शरददादा सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले. आदिवासी भागात सतत कार्यरत असणाऱ्या सौ.सुनिताताई बोऱ्हाडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा होऊन महिलांचा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. आदिवासी भागातील ग्रामस्थ व महिला भागींनीनी खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे पुष्पवृष्टीसह ढोल – लेझीमचा गजर करत जोरदार स्वागत केले. कार्यक्रम प्रसंगी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष अरुण गिरे, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील, महिला आघाडीच्या शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख सौ.सारीका पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष वाघ, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुनिल चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख विकास राऊत, शिवसेना उपतालुकाप्रमुख दत्ता गवारी, जुन्नरचे मा.उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी, शिवसेना जुन्नर शहरप्रमुख अविनाश कर्डिले, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.स्वातीताई ढोले, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक सौ.प्रियांका शेळके, सरपंच महेश शेळके, शिवसेना तालुका समन्वयक, अशोक बोचरे, सरपंच सौ.पुष्पा डामसे, प्रविण आसवले, बबन वालकोळी, संदीप डोळस, गणेश कोल्हाळ, यांच्यासह हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.

 

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.