आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी (ता.आंबेगाव) येथील भैरवनाथ मंदिरात भराड गोंधळाचे घट सोहळा संपन्न!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील भैरवनाथ मंदिरात भराड गोंधळाचे घट सोहळा संपन्न!!

धामणी (ता.आंंबेगाव) येथील पुरातन श्री भैरवनाथ मंदिरात चैत्र शुध्द चतूर्दशी सोमवार दिनांक २२एप्रिल २०२४ रोजी पाच नामाचे भराड गोंधळाचे घटाचा कार्यक्रम सदानंदाचा येळकोट भैरवनाथाचे चांगभले, अंबाबाईचा उदे उदे!!असा जयघोष करुन भंडारा उधळून मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याचे भैरवनाथ देवस्थानाचे सेवेकरी समस्त रोडे मंडळीनी सांगितले.

दरवर्षी चैत्री पोंणिमेच्या अगोदरच्या दिवशी धामणी येथील या भैरवनाथ मंदिरात समस्त रोडे व जाधव मंडळीच्या वतीने भैरवनाथाचे भराडाचे घट बसवून त्या ठिकाणी भराड्याकडून भैरवनाथाचे पाच नाम भराडगोंधळ घालण्यात येतो.

यावेळी सुनंदा रोडे,सुमन रोडे,अरुणा रोडे,सुनिता रोडे,कमल रोडे,रोहीणी रोडे,लता रोडे,सुरेखा रोडे,आशाबाई रोडे,बबूबाई रोडे,रंजना रोडे व अंजना रोडे यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पूर्वीपासून चालत असलेली पाच नामाच्या भराड गोंधळाची परंपरा रोडे व जाधव जथेकरी महिलांनी जपलेली आहे.फार पूर्वीपासून चंपाषष्ठीला खंडोबाचे पाच नामाचे जागरण करण्याची परंपरा आहे.त्याप्रमाणे येथील भैरवनाथ मंदिराचे आवारात चैत्र चर्तुदशीला भराड घटाला मंदिराचे आवारात खूप गर्दी होऊन जागा पुरत नसायची असे जुन्या मंडळीनी सांगितले.

यावेळी कैलास रोडे,आबासाहेब रोडे,गोपाळ रोडे सर,निलेश रोडे,अक्षय रोडे,सुहास रोडे,किसनराव रोडे,सुरेश रोडे,चंद्रकांत रोडे,शांताराम रोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.