आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) शाळेचा शाळा पूर्व तयारी मेळावा २०२४-२५ उत्साहात संपन्न!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) शाळेचा शाळा पूर्व तयारी मेळावा २०२४-२५ उत्साहात संपन्न!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वर्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडीचा शाळा पूर्वतयारी मेळावा २०२४-२५ उत्साहात संपन्न झाला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी(जारकरवाडी) च्या इयत्ता पहिली दाखल पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा खूप प्रभावी असून यामुळे मुलांना अंगणवाडीतील शाळेत येण्यापूर्वीच शाळेविषयी आवड तयार झालेली पाहावयास मिळाली. या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा घेऊन विद्यार्थ्यांना कुमकुम तिलक करून शाळेमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक,मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकासाची चाचणी, विविध खेळ, विविध उपक्रमांची विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती देण्यात आली.याप्रसंगी पहिली मध्ये दाखल होणारे विद्यार्थी त्यांचे पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशी माहिती मुख्याध्यापक विजय थोरात सहशिक्षिका वैजयंता थोरात यांनी दिली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.